Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यातील महिला पोलिसांसाठी दिलासादायक बातमी

Spread the love

मुंबई : राज्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक वृत्त आहे. सरकारने त्यांच्या ड्युटीचे तास कमी केले आहेत. याआधी महिला आणि पुरूष पोलीस कर्मचाऱ्यांना १२ तास ड्युटी करावी लागत होती. मात्र, आता महिला पोलीस कर्मचाऱ्यांना फक्त ८ तासच ड्युटी असेल. मात्र आपत्कालीन स्थितीत किंवा सणासुदीच्या काळात महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवले जाऊ शकतात.परंतु याबाबतचा निर्णय संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस घेऊ शकतात.

या संदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक (जीडीपी) संजय पांडे यांच्या वतीने तसे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, महाराष्ट्रात महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आता १२ तासांऐवजी ८ तास ड्युटी होणार आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठीचा हा नवीन निर्णय प्रायोगिक पातळीवर लागू करण्यात येणार आहे. सर्वसाधारणपणे, पुरूष आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांना १२ तासांची शिफ्ट असते.

पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, महिला कर्मचाऱ्यांसाठी आठ तास ड्युटी ही पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहे. यापूर्वी हा निर्णय नागपूर शहर, अमरावती शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये लागू करण्यात आला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!