Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : नाना पटोले यांच्या विरोधात भाजपचा अक्रमक पवित्रा , एकाने जीभ तर एकाने त्यांचा पंजा छाटण्याची दिली धमकी

Spread the love

जालना : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ‘मी मोदीना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो’ असे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आक्रमक झाले असून कोणी त्यांना त्यांचा पंजा छाटण्याची धमकी दिली आहे तर एकाने त्यांची जीभ छाटा आणि एक लाख रुपये मिळवा असे आव्हान दिले आहे . त्यामुळे काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.दरम्यान याच विषयावरून पटोले यांच्याविरुद्ध ठिकठिकाणी आंदोलने करून त्यांचा निषेध करून त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.


दरम्यान ‘नाना पटोलेंची जीभ छाटा 1 लाख मिळवा’ असे आव्हान जालन्यातील भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी केली आहे. जोगस यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार देखील दिली आहे.तर दुसरीकडे, नाना पटोले यांचा पंजा छाटणार अशी भाषा करणाऱ्या अनिल बोंडे यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते दिलीप ऐडतकर यांनी केली आहे. माजी कृषिमंत्री अनिल बंडे यांनी , ‘नानांनी लक्षात ठेवाव शाहिस्ते खानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल. उगीचच गमच्या मारू नको अमरावती वरून पोरं निघाले आहेत पंजा सांभाळून ठेवावा, असे वक्तव्य केले होते. तसेच ‘सोनिया गांधी यांना खुष करण्यासाठी मोदींवर किती भुंकायचे याची शर्यत काँग्रेसमध्ये लागली आहे. नाना ने तर हद्दच केली आहे. मी मालकीनचा सगळ्यात प्रामानिक कुत्रा आहे म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली, असेही अनिल बोंडे म्हणाले होते.

दरम्यान बोंडे यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून अनिल बोंडे यांनी पाठवलेली पोर कुठपर्यंत आहे त्यांचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे त्यापूर्वी अनिल बोंडे यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते दिलीप ऐडतकर यांनी केली. त्यांना जर अटक झाली नाही आणि नाना पटोले यांना जर काही धोका झाला तर येथील पोलीस त्यांला जबाबदार असतील, नाना पटोले यांनी फक्त मोदींचा उल्लेख केला आहे त्यांनी नरेंद्र मोदी असा उल्लेख कुठेही केलेला नाही त्यामुळे भाजपने हे स्वतःच्या अंगावर घेवू नये, पोलिसांनी तात्काळ अनिल बोंडे यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेसकडून अमरावती येथे करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!