Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणखी एका तरुणाची आत्महत्या

Spread the love

पुणे : एमपीएससी , यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात आलेल्या एका तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. अमर रामचंद्र मोहिते, वय ३३, असे या तरुणाचे नाव असून तो नवी पेठेत राहत होता. तो मूळचा सांगलीतल्या तासगाव इथला आहे. दरम्यान पुण्यातील हडपसर परिसरातील स्पर्धा परीक्षा देणारा स्वप्निल लोणकर या तरुणाच्या आत्महत्येला सात महिन्याचा कालावधी होत नाही. त्यातच हि घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशनचे गुन्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंडलिक कायगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,नवी पेठेतील विठ्ठल मंदिरामागे असलेल्या सोसायटीत अमर रामचंद्र मोहिते हा तरुण राहत होता.तो मूळचा तासगाव येथील असून पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी जवळपास १० वर्षापासून करत होता. त्याचा भाऊ पोलीस सेवेत आहे. आज अमर रूमबाहेर आला नाही, याबाबत त्याच्या मित्रांनी भावाला कळविले. तसेच त्याला फोन देखील करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने फोन उचलला नाही.त्यानंतर त्याच्या रुमचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता त्याने विषारी औषध घेतल्याचे आढळून आले.

अमर याला तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याला काही कौटुंबिक अडचणीही होत्या. त्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अमरचे साधारणपणे ८ महिन्यांपूर्वी लग्न देखील झाले होते. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट आढळून आलेली नाही. या घटनेबाबत अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!