Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात अखेर नाईट कर्फ्यू लागू , समजून घ्या काय आहेत निर्बंध ?

Spread the love

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी अखेर राज्य शासनाने अखेर राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रात अखेर रात्रीची संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या निर्णयानुसार  रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येणार आहे.

शासनाच्या या निर्णयानुसार  राज्यातील  जिम, स्पा आणि स्विमींग पूलही पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. तर खासगी कार्यालये, हॉटेल्स, नाट्यगृह, थिएटर्स आणि सलून्स ५० टक्के क्षमतेने चालवता येणार आहेत. तर मॉल्स सकाळी १० ते रात्री ८ या वेळेतच सुरु ठेवता येतील. तर मैदाने, उद्याने आणि पर्यटनस्थळेही पूर्णपणे बंद राहणार आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनवर कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत.

अशी आहे घोषित नियमावली…

१. पहाटे पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी
२. अत्यावश्यक कारणांशिवाय रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी
३. सरकारी कार्यालयांमध्ये व्हिजिटर्सना परवानगीशिवाय प्रवेश नाही.
४.  सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती बंधनकारक
५. करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात उपस्थित राहण्याची परवानगी
६.  विवाह सोहळ्याला फक्त ५० जणांना उपस्थित राहता येणार
७. अंत्यविधीला २० जणांना उपस्थित राहता येणार
८. राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ५० जणांच्या उपस्थितीची अट
९. शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.
१०.  स्विमींग पूल्स, स्पा, जिम, वेलनेस सेंटर आणि ब्युटी सलून्स पूर्णपणे बंद राहणार
११. केशकर्तनालय (सलून्स) ५० टक्के क्षमतेने चालवता येणार. सलून्स सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेतच सुरु ठेवता येणार
१२. नियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना निर्बंधांतून सूट. खेळाडुंना बायो बबलमध्ये राहावे लागणार. प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहता येणार नाही. दर तीन दिवसांनी खेळाडुंची करोना चाचणी करणे बंधनकारक असेल.
१३. अम्युझमेंट पार्क, किल्ले आणि स्थानिक पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद राहतील.
१४. शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येणार. मॉलमध्ये करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच परवानगी
१५.  हॉटेल्स आणि रेस्टारंटस सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत ५० टक्के क्षमतेने चालवता येणार.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!