Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

VaccinationNewsUpdate : लसीकरण न करताच तरुणांच्या मोबाईलवर लसीकरण झाल्याचे मॅसेज…

Spread the love

मुंबई : कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून या लसीकरणासाठी सर्वप्रथम कोविन पोर्टल किंवा अॅपवर नोंदणी करावी लागते. या नोंदणीनंतर लसीकरणाबद्दल माहिती मिळते. या माहितीमध्ये पहिल्या डोसची नोंदणी , पहिला डोस घेतला असेल तर दुसरा डोस घेण्याची तारीख, नजीकच्या लॅसिकरण केंद्राचे नाव, कोणती लस उपलब्ध आहे, याचा समावेश असतो. शिवाय आपण लस घेतल्यानंतर याच अॅपवर लसीकरण प्रमाणपत्रही उपल्बध करून देण्यात येते.

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानंतर १५ ते १८ वयोगटातील काही लोकांना लस न घेताच लस घेतल्याचा मेसेज असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे वृत्त आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण १ जानेवारीपासून सुरू झाले आहे. त्यासाठी अनेकांनी कोविन पोर्टलवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती. परंतु लस न घेताच त्यांना लस घेतल्याचा मेसेज प्राप्त झाला. त्यामुळे नेमकं काय घडत आहे ? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. याबात अनेकांना लास न घेताच लसीकरण केल्याचे मेसेज मोबाईलवर आल्यामुळे आपला फोन नंबर वापरून इतर कुणी तर नोंदणी केली नाही ना, अशी भीती देखील त्यांना वाटत होती. त्यानंतर अनेकांनी ट्विटरवर याबाबत पोस्ट केली आणि यावर चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत एका युजरने लिहिले, “इथं नेमकं काय चाललंय? मी माझ्या कॉलेजमध्ये आहे आणि अचानक मला हा संदेश आला की ‘तुमचे लसीकरण झाले आहे.” या युजने आपण वर्गात असल्याचा आणि लस मिळण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा पुरावा देखील शेअर केला आणि या मेसेजमध्ये किंवा कोविन पोर्टलमध्ये काहीतरी तांत्रिक त्रुटी असल्याची तक्रार केली. तसेच इतर कुणी त्याचा मोबाईल नंबर नोंदणीसाठी कसा वापरू शकतो, असा सवालही त्याने केला.
यापूर्वी, मध्य प्रदेशातील काही लोकांना लस न घेताच दुसरा डोस मिळाला आहे, असे मेसेज प्राप्त झाले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!