Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यात दंगली घडविण्याचा भाजपवर मलिक यांचा थेट आरोप

Spread the love

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी राज्यात काही ठिकाणी झालेल्या दंगलीवरून भाजप नेत्यांवर स्फोटक आरोप केले आहेत. भाजप नेत्यांनीच महाराष्ट्रात दंगल घडवण्याचे षडयंत्र रचले मात्र भाजपची हि खेळी राज्यातील जनतेने ओळखल्यामुळे राज्यात राज्यात इतर ठिकाणी असे प्रकार झाले अशी मलिक यांनी म्हटले आहे.

पात्रांशी बोलताना मलिक म्हणाले की, गेल्या शुक्रवारी काही मुस्लिम संघटनांनी महाराष्ट्रात आणि देशाच्या इतर भागांमध्ये बंदचे आवाहन केले होते. राज्यातील ३ शहरात नांदेड, मालेगाव आणि अमरावतीत दगडफेकीच्या घटना घडल्या. पोलिसांवरही दगडफे करण्यात आली. दगडफेक करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान गेल्या शनिवारी अमरावतीत भारतीय जनता पक्षाने बंदचे आवाहन केले. मात्र या बंदच्या मागून सुनियोजित पद्धतीने दंगे भडवण्याचे काम केले गेले, ज्याला पोलिसांनी पूर्णपणे नियंत्रित करण्याचे काम केले. संपूर्ण महाराष्ट्रात दंगे भडकवता यावेत यासाठी कदाचित त्यांचे हे प्रयत्न होते. मात्र महाराष्ट्राच्या जनतेने भाजपचे हे षडयंत्र ओळखले. म्हणूनच अमरावतीच्या बाहेर अशा प्रकारची घटना कोठेही घडली नाही, असे सांगत मलिक यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत.

दरम्यान भाजप नेत्यांवर दंगलीचे षडयंत्र रचण्याचा आरोप करताना मलिक यांनी थेट भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांचे नाव घेतले. त्यांच्यावर गंभीर आरोप करताना मलिक म्हणाले की, अमरावतीत कोणत्या समुदायांमध्ये दंगा झाला नाही. तर भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे आणि भाजपचे सर्व नेते यांनी २ तारखेच्या रात्री दंगलीचे षडयंत्र रचण्याचे काम केले. यासाठी काही तरुणांना पैसे वाटले गेले. तसेच दारू वाटली गेली आणि अमरावती शहरात दंगल भडकवण्याचे काम केले गेले . दगडफेक झाली, दुकानांना आग लावण्यात आली. पोलिस तपासात सर्व सत्य बाहेर आले आणि आता कारवाई सुरू करण्यात आले. ही दंगल भडकवण्यासाठी मुंबईतून पैसे पाठवण्यात आले. तेथील आमदारांकडून लोकांना पैसे वाटले गेले. आपले सर्व हत्यारं समाप्त होतात तेव्हा भाजप दंगलीचे हत्यार बाहेर काढून आपलं राजकारण करतो हा भाजपचा हातखंडा आहे. राज्यातील जनता पूर्णपणे जाणकार आहे आणि असे राजकारण कधीही स्वीकारणार नाही, असे मलिक म्हणाले. अशा विनाशकारी राजकारणाचा आम्ही निषेध करतो आणि भाजपने असे राजकारण करू नये असे आवाहन मलिक यांनी केले.

आशीष शेलार रजा अकादमीच्या कार्यालयात कशासाठी?

यावेळी भाजपनेते आशिष शेलार यांच्यावर आरोप करताना ते म्हणाले कि ,  आशीष शेलार हे रजा अकादमी यांच्या कार्यालयात गेले होते. तो फोटो आमच्याकडे उपलब्ध आहे, असे सांगतानाच इतकं महत्वाचं काम काय होतं जे भाजपचे नेते रजा अकादमीच्या कार्यालयात जातात हे आशीष शेलार यांनी स्पष्ट करावे , असेही मलिक यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!