‘कॅरोटिड’ शस्त्रक्रियेनंतर रजनीकांत घरी परतले

सुपरस्टार रजनीकांत यांना यांच्या तब्येतीत सुधार असून त्यांना आता रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अचानक चक्कर आल्याने चेन्नईतील कोवेरी रूग्णालयात रुटीन चेकअप करण्यात आले होते. पण त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
रजनीकांत यांना अचानक चक्कर आल्याने चेन्नईतील कोवेरी रूग्णालयात त्यांचे रुटीन चेकअप करण्यात आले होते. पण त्यानंतर यांच्यावर कॅरोटिड आर्टेरी रिवास्कुलराईजेशन ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मेंदुला होणारा रक्तपुरवठा पुनर्संचयित करण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात येते. रजनीकांत यांच्यावर ही शस्तक्रिया यशस्वीपणे पार पडल्यावर डॉक्टरांनी त्यांना लवकरच डिस्चार्ज देऊ, अशी माहिती दिली होती. दरम्यान, रजनीकांत यांचा रूग्णालयातील मुक्काम वाढला होता. त्यामुळे त्यांचे चाहते मात्र चिंताग्रस्त झाले होते. पण आता यांच्या तब्येतीत सुधार असून त्यांना आता रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.