Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : बालकाला पळवून नेण्याचा प्रयत्न रेल्वे पोलिसांनी हाणून पडला

Spread the love

औरंगाबाद  : नांदेडच्या सचखंड गुरुद्वाऱ्यातील ११ वर्षीय बालक मंमितसिंग जीवनसिंग याला यास आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान परराज्यातील समूहाने पळवून चालवले होते मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे हा प्रयत्न फसला असून मुलाला ताब्यात घेण्यास यश मिळाले. 01402 आदीलाबाद मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसच्या S-5कोच मध्ये संशयास्पद हालचाली वाटल्याने ‘रेल्वे सेना खबर पक्की गृप सदस्य याने ही माहिती रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना परतूर रेल्वे स्टेशन दिली व फोटो पाठवून दिला तसेच यामुलांची अधिक माहिती नांदेड रेल्वे सेना टीम सह इतर ग्रुपला दिली आणि यावरून नांदेड रेल्वे स्टेशन परिसरात काही शीख बांधव एक मुलगा हरवला व शोध घेत आहेत सांगितले त्यांना त्याचा फोटो दाखविताच होय याच मुलास शोध घेत आहेत असे कळविले.

दरम्यान त्यांच्यासोबत असलेल्या मुलाविषयी चौकशी केल्यास शीख समुदाय अधिक आक्रमक पवित्रा घेऊ शकतो , हे लक्षात घेऊन या मुलास सुरक्षित स्थळी उतरून घेऊ हा मानस ठेवून औरंगाबाद येथे RPF , GRP , रेल्वे सेना टीम सह शीख समाजाचे नेते यांना माहिती देऊन सज्य ठेवले याच गाडीतील RPF स्कॉटिंग च्या कर्मचारी देखील यामुलावर शांत पणे चोख बंदोबस्त देत औरंगाबाद येथे आले. तेंव्हा नंदीग्राम एक्सप्रेस औरंगाबाद स्टेशन ला रात्री 21:30-35 वा पोहचली आणि मोठ्या गोंधळात  अखेर या मुलास औरंगाबाद येथे ताब्यात घेण्यात आले. यावेळी GRP चे HC धनराज गडलिंगे , चरणसिंग राठोड , चौधरी , वैभव सपकाळे RPF चे PI परमवीर सिंग , ASI विजय वाघ , रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी रेल्वे सेना सदस्य मुजीब खान श्रीराम सेना लखबिर सिंग बिंद्रा आदी उपस्थित होते

आपलं सरकार

Click to listen highlighted text!