CoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासांत देशात १८ हजार ९८७  नवीन कोरोनाबाधित

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली :  गेल्या २४ तासांत देशात १८ हजार ९८७  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून २४६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १९ हजार ८०८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. या नवीन बाधितांसह एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ४० लाख २० हजार ७३०वर पोहोचली आहे. आतापर्यंत ३ कोटी ३३ लाख ६२ हजार ७०९ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ४ लाख ५१ हजार ४३५ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

Advertisements

देशात सध्या २ लाख ६ हजार ५८६ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९८.०७ टक्के आहे. विकली पॉझिटिव्हीटी रेट १.४४ टक्के असून डेली पॉझिटिव्हीटी रेट १.४६ टक्के आहे. हा दर गेल्या ४५ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान गेल्या २४ तासांत ३५ लाख ६६ हजार ३४७ जणांचं लसीकरण करण्यात आले आहे . राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ९६ कोटी ८२ लाख २० हजार ९९७ जणांचे  लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

आपलं सरकार