MaharashtraNewsUpdate : कोरोनामुळे अनाथ झलेल्या बालकांच्या खात्यावर प्रत्येकी पाच लाख जमा

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : राज्य सरकारने कोरोनाच्या संकटात  दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे अशा बालकांच्या खात्यात ५ लाख रुपये जमा केले जात असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिली. दरम्यान आतापर्यंत कोरोनामुळे अनाथ बालकांची राज्यातील एकूण संख्या सुमारे ६०० इतकी आहे. उर्वरित बालकांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा करण्यात येतील, असेही ठाकूर यांनी म्हटले आहे.

Advertisements

राज्यात  गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत कोरोनामुळे राज्यातील अनेक  जिल्ह्यातील शेकडो बालकांचे आई वडिलांचे छत्र हरपल्याने हि बालके अनाथ झाली आहेत. अशा बालकांच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, एकूणच त्यांच्या संरक्षणासाठी काही आर्थिक तरतूद करणे गरजेचे होते. यासाठी महिला बाल विकास विभागाच्यावतीने यशोमती ठाकूर यांनी विशेष प्रयत्न केले. यानंतर राज्य सरकारने कोरोनामुळे  अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यामध्ये प्रत्येकी ५ लाख रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार नुकतेच राज्यातील ३०६ अनाथ बालकांच्या खात्यात सुमारे १५ कोटी ३० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

Advertisements
Advertisements

राज्याच्या २४ जिल्ह्यांमधील बालकांच्या खात्यात पैसे वर्ग

राज्यातील गोंदिया, चंद्रपूर, सांगली, वर्धा, सोलापूर रायगड अलीबाग, रत्नागिरी, नाशिक, अमरावती आणि पुणे, नागपूर अशा विविध २४ जिल्ह्यांमधील बालकांच्या खात्यात पैसे वर्ग झाल्याची माहिती विभागाला नुकतीच मिळाली आहे. यामुळे या बालकांना काही प्रमाणामध्ये आर्थिक सुरक्षितता देता आली. विविध योजनांच्या माध्यमातून या बालकांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी प्रयत्न केले जातील असंही, यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

आपलं सरकार