FakeNewsCheck : हास्यास्पद : नेते एकपट आणि भक्त दसपट !! न्यूयॉर्क टाईम्सच्या “त्या” लेखाविषयी जाणून घ्या…

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्तांकडून मोदींचे कौतुकाचे सोहळे काही काही बंद होताना दिसत नाहीत हे जग जाहीर आहे. खऱ्या खोट्या बाता मारण्यात कुणी एक पट असेल तर हे दसपट असतात. पण का करायचे असे ? मोदी विश्वविख्यात नेते आहेत ते आहेतच हे भक्तांनी मान्यच केलेले आहे आणि त्यात कोणी वाद करण्याचे कारणही नाही.

Advertisements

आता तर मोदी भक्तांनी दावा केला आहे कि , अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींचं कौतुक करणारा लेख छापला आहे, असा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. तसेच हा लेख द न्यूयॉर्क टाईम्सचे एडिटर-इन-चीफ जोसेफ होप यांनी लिहिल्याचे ठोकून देण्यात आले आहे. या लेखात मोदींना धोकादायक देशभक्त म्हणण्यात आले असून त्यांच्या नेतृत्वामुळे आणि राजकारणातील कौशल्यामुळे ते महाशक्ती बनू इच्छिणाऱ्या देशांसाठी धोका असल्याचं म्हटले आहे. द न्यूयॉर्क टाईम्सचा हा फोटो फेसबुक आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या लेखाचं शिर्षक “मोदी कोण आहेत ?”, न्यूयॉर्क टाईम्सचे एडिटर-इन-चीफ जोसेफ होप यांचा लेख” असे आहे.

Advertisements
Advertisements

काय आहे वस्तुस्थिती ?

मोदी भक्तांनी सोशल मीडियात फेकलेल्या या लेखात लिहिले आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकमेव उद्देश भारताला एक चांगला देश बनवणे आहे. जर त्यांना आताच रोखले नाही तर भारत जगातला सर्वात शक्तिशाली देश बनेल आणि अमेरिका, युके तसेच रशिया केवळ पाहत राहतील. दरम्यान, ही पोस्ट खूप व्हायरल झाल्यानंतर इंडिया टुडेच्या अँटी फेक न्यूज वॉर रुमने याबद्दल फॅक्टचेक करायचे ठरवले . त्यात ही पोस्ट खोटी असून द न्यूयॉर्क टाईम्सने असा कोणताही लेख छापला नसल्याचं समोर आले आहे. तसेच या माध्यम समुहात जोसेफ होप नावाची कोणतीच व्यक्ती कार्यरत नसून त्यांचे एडिटर-इन-चीफ डीन बकेट आहेत. डीन बकेट यांनी आतापर्यंत पंतप्रधान मोदींवर कोणताही लेख लिहिला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आले आहे.

ते लेखकही न्यूयॉर्क टाईम्समध्ये नाहीत !!

इंडिया टुडेच्या अँटी फेक न्यूज वॉर रुमने स्पष्ट केले आहे कि , लेखाची भाषा थोडी संशयास्पद वाटते. द न्यूयॉर्क टाईम्सच्या मानकांप्रमाणे या लेखाच्या भाषेत अनेक वाक्यरचना चुकीच्या आहेत, शिवाय व्याकरणाच्या चुका देखील आहेत. द न्यूयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर शोधूनही हा लेख सापडला नाही. तसेच कर्मचाऱ्यांची माहिती असलेल्या सेक्शनमध्ये जोसेफ होप नावाची कोणतीच व्यक्ती आढळली नाही. सोशल मीडियावर जोसेफ होप एडिटर-इन-चीफ असल्याचे म्हटले आहे. दरम्यान त्यांच्या शोधानुसार “जोसेफ होप” हे नाव शोधल्यानंतर एक व्यक्ती आढळली ती एशियन टाईम्समध्ये इंडिपेंडंट रिसर्चर म्हणून काम करीत असल्याचे आढळून आले मात्र त्यांचा कोणताही लेख या लेखाशी संबंधित नाही. त्यानंतर इंडिया टूडेने न्यूयॉर्क टाईम्सच्या वाईस प्रेसिडेंट , कम्युनिकेशन डेनियल रोडेस यांच्याशी संपर्क साधला. मेलवर त्यांनी सोशल मीडियावरील दावे फेटाळून लावले. तसेच “आम्ही असा कोणताच लेख छापला नसून जोसेफ होप नावाचा कोणताच कर्मचारी आमच्याकडे नाही तसेच न्यूयॉर्क टाईम्सचे एडिटर डीन बकेट असून त्यांनी असा लेख लिहिलेला नाही,” असे त्यांनी सांगितले.

आपलं सरकार