CoronaMaharashtraUpdate : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट , “या” विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई :  राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार २८६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार ३२० इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार ९३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ४ हजार ०५० इतकी होती. तर, आज ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ६१ इतकी होती. आज राज्यात झालेल्या ५१ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ५७ हजार ०१२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२३ टक्के इतके झाले आहे.

Advertisements

राज्यात कालच्या तुलनेत आज करोना बाधितांच्यादैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. शिवाय मृत्यूची संख्याही कमी झाली आहे. तर दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या किंचित घटली असली, तरी कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटल्याने राज्यातील करोना संसर्गाची आजची स्थिती तुलनेने दिलासादायक आहे. आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३८ हजार ४९१ इतकी आहे. काल ही संख्या ३९ हजार १९१ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र पुण्यातील ही रुग्णसंख्या आज घटल्याचे दिसून आले  आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ९ हजार ५३० इतका आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या ६ हजार ०१२ आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या २ हजार ५०२ वर आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार २१२ अशी आहे. तर, सांगलीत एकूण १ हजार ६३५ आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार ८०३ इतकी आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार २७८ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६९३ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ६२९, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९७० इतकी आहे. काल  नंदुरबार, धुळे आणि भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी ३ सक्रिय रुग्ण असून या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४३३, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १३२ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या ९४ वर आली आहे. तर नंदुरबार, धुळे आणि भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी ३ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७८ लाख १९ हजार ३८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ३७ हजार ८४३ (११.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ५८ हजार ६५३ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत. तर, १ हजार ४६२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात 12 नवे रुग्ण , एकही मृत्यू नाही

औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 23 जणांना (मनपा 09, ग्रामीण 14 ) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 850 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 12 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 579 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 568 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 161 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (07)
हडको 1, चिकलठाणा 2, बजरंग नगर 1, माऊली नगर 1, अन्य 2
ग्रामीण (05)
गंगापूर 4, सिल्लोड 1

यांना लोकल प्रवासाचं परवानगी

मुंबई : कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET) परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी, सक्षम प्राधिकरणाने उमेदवारांना मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मध्ये लोकल ट्रेन सेवेद्वारे प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. सीईटीच्या विद्यार्थ्यांना १० ऑक्टोबर पर्यंत तर एमपीएससीच्या उमेदवारांना २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत लोकलने प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. लोकलने प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना आधीच लोकलने प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

आपलं सरकार