#UPSCResult | यूपीएससी नागरी सेवा 2020 अंतिम निकाल जाहीर

Advertisements
Advertisements
Spread the love

यूपीएससीने नागरी सेवा 2020 चा अंतिम निकाल जाहीर केला असून. शुभम कुमार या परीक्षेत अव्वल आला आहे. यूपीएससीच्या निकालानुसार, नागरी सेवा परीक्षेत जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे.

Advertisements

नागरी सेवा परीक्षा 2020 जानेवारी 2021 मध्ये लेखी आणि सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये मुलाखती झाल्या होत्या. यातून 263 जनरल, 86 ईडब्ल्यूएस, 229 ओबीसी, 122 एससी, 61 एसटी असे एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 545 पुरुष आणि 216 महिला आहेत. त्यापैकी 180 आयएएस, आयएफएस 36, आयपीएस 200, अ गटातील केंद्रीय प्रशासकीय सेवा 302, ब गटातील प्रशासकीय सेवा 118 आहे.

Advertisements
Advertisements

पुण्यातील अंध विद्यार्थिनी पूजा कदम ही युपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. तिने यात 577 वी रँक मिळवली आहे. तर, लातूरची 21 वर्षांची नितिशा जगताप पहिल्याच प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण झाली असून, ती 199 व्या रँक वर आहे. तसेच, लातूर येथील निलेश गायकवाड यूपीएससीमध्ये देशात 629 रँकने उत्तीर्ण झाला आहे. गेल्या वर्षी ही निलेशने यूपीएससी परीक्षा दिली होती. त्यावेळी 752 रँक आली होती. तो सध्या संरक्षण सहाय्यक नियंत्रकपदी नियुक्तही झाला होता. सध्या त्याची पुणे येथे ट्रेनिंग सुरु आहे.

आपलं सरकार