CoronaMaharashtraUpdate : जाणून घ्या राज्याची आजची कोरोनाची स्थिती

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार ६०८ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार १३१ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ४ हजार २८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ४ हजार ०२१ इतकी होती. तर, आज ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ७० इतकी होती. आज राज्यात झालेल्या ४८ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ४९ हजार ०२९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२१ टक्के इतके झाले आहे.

Advertisements

राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत घट

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३९ हजार ९८४ इतकी आहे. काल ही संख्या ४० हजार ७१२ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ११ हजार ३४४ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या ५ हजार ५०७ आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या २ हजार ७९४ वर आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार १०० अशी आहे. तर, सांगलीत एकूण १ हजार ५८६ आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ११७ इतकी आहे.

Advertisements
Advertisements

मुंबईत उपचार घेत आहेत ५,०८३ रुग्ण

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार ०८३ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६३७ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ६७८, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९५० इतकी आहे. तर धुळे, वाशिम जिल्ह्यात एक सक्रिय रुग्ण आढळला असून औरंगाबादमध्ये ४१२, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १४२ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या ९२ वर आली आहे. तर नंदुरबारमध्ये आणि धुळे जिल्ह्याच प्रत्येकी १ सक्रिय रुग्ण आहे. दरम्यान आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७४ लाख ७६ हजार १४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ३१ हजार २३७ (११.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ६४ हजार ४१६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर, १ हजार ६७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आपलं सरकार