Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : “फडणवीस दबंग नेते , अजित पवारांसारख्या शंभर जणांना खिश्यात घेऊन फिरतात ” : चंद्रकांत पाटील

Spread the love

मुंबई  :  देवेंद्र फडणवीस  हे असे दबंग नेते आहेत कि , अजित पवारांसारख्या शंभर जणांना खिश्यात घेऊन फिरतात’, अशा शब्दात  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. दरम्यान  ‘अजित पवारांचं प्रकरण सुरू आहे, त्यांचे  नाव एफआयआरमध्ये आहे, असाही दावाही त्यांनी केला. मुंबईत पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीकेची तोफ डागली. देवेंद्र फडणवीस यांच्या वयावर जाऊ नका . त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे नाही, आज काय झाले  तर उद्या काही कळणार नाही. पाच वर्ष ते मुख्यमंत्री राहिले. त्यांना शिवसेनेने  खूप त्रास दिला. पण, तरीही त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. मात्र, पहाटेच्यावेळी अजित पवारांसोबत शपथ घेणे हे जरा रिस्कीच होते , असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

सोमय्या यांच्यावर कारवाईबद्दल बोलताना तर म्हणाले कि , गेले २४ तास सरकारची दंडुकेशाही सुरू होती. हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले.  हसन मुश्रीफांना माझं नाव घेतल्याशिवाय झोपही लागत नाही.  कायद्याची लढाई कायद्याने लढा, कायद्याची लढाई कोल्हापुरी चपलेने  लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणे  सोपे आहे, पण ईडीला फेस करणे  कठीण आहे. तोंडाला फेस येईल. पश्चिम महाराष्ट्रात भाजप मजबूत आहे मुश्रीफांनी माझी चिंता करू नये. मुश्रीफ साहेब, पश्चिम महाराष्ट्रातून, कोल्हापुरातून आम्ही भुईसपाट झालो, असा आरोप तुम्ही करताय. पश्चिम महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर येत नाही. सोलापुरात भाजपचे फक्त दोन आमदार होते. ते आता ८ झाले आहेत.

कारखान्यांमध्ये ज्या कंपन्यांमधून ९८ कोटी आले त्या कंपन्या कुठे आहेत यावर बोला. त्या कंपन्यांनी कोलकातामधून सेनापती घोरपडे कारखान्यात कशी गुंतवणूक केली त्यावर तुम्ही बोला. त्यामुळे मला मुश्रीफ यांना आवाहन करायचं आहे शांत डोक्याने काम करा. आमच्या रडारवर मंत्र्यांचे जावई नाहीतर भ्रष्टाचार असल्याचं चंद्रकांत पाटील स्पष्ट बोलले आहेत. माझ्यावर खुशाल बदनामीचा खटला भरा. मुश्रीफ गुद्यावर येऊ नका, कायद्याने लढा. मी त्याचवेळी सीएमना बोललो होतो गृह खातं राष्ट्रवादीकडे देऊ नका. हे जे काही चाललं आहे हे त्याचे फलित आहे. राज्यसभेसाठी संजय उपाध्याय हे भाजपचे उमेदवार असतील. पक्षाचे सरचिटणीस आहेत. सगळ्या चौकशीला आम्ही तयार आहोत. पण झुंडशाहीला अजिबात घाबरणार नाहीत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!