Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GujratNewsUpdate : मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलयांच्या मंत्रिमंडळात २४ मंत्र्यांचा समावेश , जुन्या दाखवला बाहेरचा रस्ता

Spread the love

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी शपथ घेतल्यानंतर आधीच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना डच्चू देत आज २४ नव्या मंत्र्यांनी शपथ देण्यात आली.त्यामुळे रूपांनी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना चांगलाच दणका बसला. नव्या मंत्रिमंडळात १० जणांना कॅबिनेट, तर १४ जणांना राज्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली आहे.

भूपेंद्र पटेल यांच्या नवीन मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून राजेंद्र त्रिवेदी, जितेंद्र वघानी, ऋषिकेश पटेल, पूर्णश कुमार मोदी, राघव पटेल, उदय सिंह चव्हाण, मोहनलाल देसाई, किरीट राणा, गणेश पटेल, प्रदीप परमार यांचा तर राज्यमंत्री म्हणून हर्ष सांघवी, जगदीश ईश्वर, बृजेश मेरजा, जीतू चौधरी, मनीषा वकील, मुकेश पटेल, निमिषा बेन, अरविंद रैयाणी, कुबेर ढिंडोर, कीर्ति वाघेला, गजेंद्र सिंह परमार, राघव मकवाणा, विनोद मरोडिया, देवा भाई मालव यांना शपथ देण्यात आली.

गुजरातच्या शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी ४.३० वाजता गांधीनगर येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीला प्रारंभ झालं आहे. तसेच निमा आचार्य यांची विधानसभा सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर आधीचे सभापती राजेंद्र त्रिवेदी यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील २२ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यात अप्रत्यक्षपणे बंडखोरीचा संदेश देणारे माजी उप मुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही समावेश आहे. मंत्रिमंडळातील या सर्वंकष बदलामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार हा शपथविधी सोहळा बुधवारी दुपारी होणार होता. मात्र नव्या मंत्रिमंडळाबाबत रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल नाराज होते . त्यामुळे बुधवारी सकाळपासून रात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं सुरु होती. त्यानंतर हायकमांडने नाराज नेत्यांची समजूत काढण्याची जबाबदारी रुपाणी यांच्यावर सोडली होती. आज शपथविधी सोहळा पाहता नाराज असलेल्यांना बाहेरचा दाखवण्यात आल्याने भाजप अंतर्गत वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!