SakinakaRapeCaseUpdate : साकीनाका बलात्कार प्रकरणात पोलिसांना मिळाले महत्वाचे पुरावे , आरोपीविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचाही गुन्हा : हेमंत नगराळे

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : मुंबईला हादरवून सोडणाऱ्या साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या अटकेनंतर महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून घटनेची माहिती मिळताच अवघ्या दहा मिनिटांत आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज एका पत्रकार परिषदेत या प्रकरणाच्या तपासाची माहिती दिली. नागराळे यांनी सांगितले कि , आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपीवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.

Advertisements

१० सप्टेंबर रोजी मुंबईतील साकीनाका येथे  एका ३२ वर्षीय महिलेवर टेम्पोत बलात्कार करून  तिला अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर पीडितेवर  राजावाडी रुग्णालयात उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी सुरू असलेल्या पोलीस तपासाबाबत हेमंत नगराळे यांनी आज सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले कि , आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून  त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे हाती लागले आहेत. गुन्ह्याचा घटनाक्रमही स्पष्ट झाला आहे. आमचा तपास येत्या महिनाभरात किंवा त्यापूर्वीच पूर्ण होईल. आरोपीचे महाराष्ट्रात अद्याप कोणतेही क्रिमिनल रेकॉर्ड सापडलेले नाही. आता आम्ही उत्तर प्रदेशमध्ये आरोपीवर काही गुन्हे दाखल आहेत का याचा तपास करत आहोत.

Advertisements
Advertisements

या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक तसेच अन्य अधिकाऱ्यांची आज बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदत जाहीर केली आहे, अशी माहितीही आयुक्तांनी दिली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांशी तसेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा झाल्याचे नगराळे म्हणाले.

दरम्यान साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर  ‘प्रत्येक घटनेच्या ठिकाणी पोलीस हजर राहू शकत नाहीत’ असे विधान हेमंत नगराळे यांनी केले होते. त्यावर बरीच टीका झाली होती. त्याबाबत बोलताना ते म्हणाले कि, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. पोलीस प्रत्येक घटनेच्या ठिकाणी हजर असू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे पण पोलीस तिथपर्यंत पोहचणार हे मात्र निश्चित आणि म्हणूनच आम्ही १० मिनिटांत तिथे पोहचू शकलो व आरोपीला पकडू शकलो, असे नगराळे म्हणाले. मी माझ्या विधानावर ठाम असल्याचेही ते म्हणाले.


#MahaClassified | #Advertisement | #MahanayakOnline

https://www.facebook.com/Swara-Financial-Servises-175291287938494/?ti=as

🙋‍♂️ मेडीक्लेम का❓ कशासाठी❓

🙋‍♂️ ९०% परिवारांकडे आपत्कालीन वेळेसाठी जमापुंजी रक्कम ठेवलेली नसते…. म्हणून मेडीक्लेम असावी.

🙋‍♂️ हॉस्पिटल हा आता, एक मोठा व्यवसाय झाला आहे…. म्हणून मेडीक्लेम असावी.

🙋‍♂️गरज लागल्यावर लगेच मेडीक्लेम कधीच मिळत नाही…. म्हणून मेडीक्लेम असावी.

🙋‍♂️कमी वयात मेडीक्लेम घेतली तर प्रीमियम सुध्दा कमी लागतो…. म्हणून मेडीक्लेम असावी.

🙋‍♂️मेडीक्लेम असल्यास कॅशलेस सुविधा मिळते…. म्हणून मेडीक्लेम असावी.

🙋‍♂️मेडीक्लेम नसेल तर आप्त- नातेवाईक ह्याच्या कडे मदत मागावी लागते…. म्हणून मेडीक्लेम असावी.

🙋‍♂️मेडीक्लेम नसल्यास आर्थिक कोंडी होते, आयुष्य किमान २/५ वर्षांनी मागे येते…. म्हणून मेडीक्लेम असावी.

🙋‍♂️संपूर्ण मनःशांती सहित चांगले उपचार घेता यावेत…. *म्हणून मेडीक्लेम असावी.

🙋‍♂️सर्वात महत्वाचे म्हणजे, योग्य वेळीचं घेतलेली मेडीक्लेम असावी, ज्यामुळे नियम/अटी चा अडथळा येऊ नये….नियमानुसार सर्व फायदे घेता यावेत…. म्हणून मेडीक्लेम असावी तीही गरज नसताना घेतलेली. म्हणजे गरजेला तीच धावून येते…. “तुमची मेडीक्लेम”

👌मेडीक्लेम ही आज गरज वाटत नसेल तर….आपण बाकी १०% मध्ये असाल तर आनंदच😊…..पण नसाल तर 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️ ही वेळ येण्याची वाट पाहण्याची वेळ कोणावरही येऊ नये.

तर मग आजच आपला आरोग्य विमा काढून आपल्या संपुर्ण कुटुंबाला सुरक्षित करा.

Contact
Swara Financial Services

Vishal Kharat
Insurance & Investment Advisor
Mob- 9421911143

News Update on one click

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

📢 जाहिरातीसाठी संपर्क -9028150765 / 9421671520

आपलं सरकार