Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CricketNewsUpdate : रोमांचक चौथ्या कसोटीत इंग्लंडला १५७ धावांनी हरवले , इंग्लंडच्या ‘होमपीच’वर भारताने फडकावला तिरंगा !!

Spread the love

लंडन : ओव्हल कसोटीत भारताने लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर इंग्लंडचा सुपडासाफ करीत १५७ धावांनी दमदार विजय मिळवत तिरंगा फडकावला आहे. दरम्यान या विजयासह भारताने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतल्यामुळे भारताने पाचवा सामना गमावला तरी त्यांना मालिका गमवावी लागणार नाही, या परिस्थितीत मालिका २-२ अशी बरोबरीत सुटू शकते. तर अखेरचा आणि पाचवा सामना अनिर्णीत राहीला तर भारतीय संघ ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकू शकते. गेल्या ५० वर्षातील हा महत्वाचा विजय मानला जात आहे.

या पाचव्या सामन्यात वेगवान गोलंदाज म्हणून एंट्री केलेल्या शार्दुलने सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये अर्धशतकं झळकावून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. जिथे भारतीय फलंदाजांची कामगिरी कमी पडत होती तिथे शार्दुलने दोन्ही डावांत संघाला गरज लक्षात घेऊन धडाकेबाज खेळी करीत दोन्ही डावांत अर्धशतकं केली. हि कामगिरी करणारा तो भारताचा एकमेव तळाचा फलंदाज ठरला.

शार्दुलने यावेळी भारताच्या मार्गात अडरस बनू शकणाऱ्या जो रुटला दुसऱ्या डावात लवकर बाद केले आणि त्यानंतरच भारतीय संघाला विजयाची आशा निर्माण झाली. दमदार फलंदाजी करणाऱ्या शार्दुलने भेदक गोलंदाजीही करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे भारतासाठी यावेळी शार्दुल उपयुक्त खेळाडू ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण पहिल्याच डावात शार्दुलने एक आणि दुसऱ्या डावात दोन बळी मिळवले. त्यामुळे एका सामन्यात दोन अर्धशतक आणि तीन बळींसह शार्दुलने सर्वोत्तम कामिगिरी केली.

Click to listen highlighted text!