Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबुधाबीचे राजकुमार मोहम्मद बिन जायद यांच्यात झाली हि चर्चा…

Spread the love

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीचे राजकुमार मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी फोनवरून संवाद साधताना दहशतवादाला थारा न देण्याबद्दल दोन्ही नेत्यांचे एकमत झाले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान या दोन्ही नेत्यांत सामायिक रणनीतीच्या प्रगतीसंदर्भात चर्चा झाली. तसेच दोघांनी भौगोलिक विकासावरही चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ‘दुबई एक्स्पो’करता राजकुमार नाहयान यांना शुभेच्छा दिल्या.


याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने माहिती देताना म्हटले आहे कि , पंतप्रधान मोदी यांनी अबुधाबीचे राजकुमार शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला. या दरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत – यूएई व्यापक रणनैतिक संबंधांतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्यात निरंतर प्रगतीची समिक्षा केली.तसेच दहशतवादाला थारा देणार नाही, या मुद्यावर दोन्ही नेत्यांत एकमत झालं. तसंच अशा पद्धतीच्या ताकदींविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाच्या एकत्र उभं राहण्याच्या महत्त्वावर जोर देण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटरअकाऊंटवरूनही या संवादा संदर्भात माहिती देण्यात आली असून या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , ‘शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यासोबत अतिशय महत्त्वपूर्ण टेलिफोनिक संवाद साधला. व्यापक रणनीतीच्या भागीदारीच्या प्रगतीची समिक्षा तसंच क्षेत्रीय विकासावर चर्चा केली. कोविड १९ दरम्यान भारतीय समुदायाला मिळालेल्या यूएईच्या समर्थनाचे कौतुक करून दुबई एक्स्पोसाठी शुभेच्छा दिल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!