Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharshtraUpdate : दिलासादायक : राज्यातील मृत्यू आणि सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट

Spread the love

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ४ हजार ३४२ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ४ हजार ४५६ इतकी होती त्यामुळे राज्याला किंचित दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात एकूण ४ हजार ७५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ४ हजार ४३० इतकी होती. तर, आज ५५ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या १८३ इतकी होती.


दरम्यान आज राज्यात झालेल्या ५५ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ८१ हजार ९८५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतके झाले आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार ६०७ वर आली आहे. काल ही संख्या ५१ हजार ०७८ वर होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा वाढून तो १४ हजार ६६० वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या कमी होत ती ६ हजार ८९८ वर आली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ५ हजार ६८४ इतकी खाली आली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ४ हजार ९२८ वर घसरली आहे. तर, सांगलीत एकूण ३ हजार ७७८ इतकी वाढली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ९४७ वर खाली आली आहे.

राज्यात २ लाख ८७ हजार ३८५ व्यक्ती होमक्वारंटाईन

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ३ हजार ७५६ इतकी वाढली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ०९२, सिंधुदुर्गात ९४१, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ७१४ इतकी आहे. नंदूरबार, गोंदिया जिल्ह्यात फक्त दोन सक्रिय रुग्ण असून या बरोबरच, औरंगाबादमध्ये ५८५, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ८२ वर खाली आली आहे. अमरावतीत ही संख्या १०१ वर आली आहे. राज्यात नंदुरबार आणि गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्ण असून हीच राज्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४३ लाख २७ हजार ४६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ७३ हजार ६७४ (११.९२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८७ हजार ३८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर, १ हजार ९७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात २१ नवे रुग्ण 

औरंगाबाद जिल्ह्यात आज १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून  आजपर्यंत एक लक्ष ४४ हजार ३६४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण २१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष ४८ हजार १२३ झाली आहे.  तर दोघांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार ५३४ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण २२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!