Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaRecruitmentUpdate : देशाच्या गुप्तचर विभागात आयबीमध्ये ५२७ पदांसाठी भरती

Spread the love

नवी दिल्ली : देशाच्या गुप्तचर विभागात आयबीमध्ये ५२७ पदांसाठी भरती होणार आहे. उपसंचालक, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर, सीनियर रिसर्च ऑफिसर, रिसर्च असिस्टंट, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, असिस्टंट जनरल इंटेलिजन्स एक्झिक्युटिव्ह, अकाऊंटंट, सुरक्षा अधिकारी, स्टाफ नर्स, केअरटेकर यासह इतर पदावर भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता

विविध पदानुसार ,दहावी, बारावी, पदवी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांकडे ड्रायव्हिंग लायसन्स देखील असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

विविध पदांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त वयोमर्यादा 56 वर्ष निश्चित करण्यात आली आहे.
एसी, एसटी, ओबीसी, दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

पदांचा तपशील

उपसंचालक – 2
डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर – 10
ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर – 168
सीनियर रिसर्च ऑफिसर – 02
रिसर्च असिस्टंट – 2
सिनिअर फॉरेन लँग्वेज – 1
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर – 2
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर एक्झिक्युटिव्ह – 56
असिस्टंट ज्युनिअर इंटेलिजन्स एक्झिक्युटिव्ह – 96
ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर – 13
पर्सनल असिस्टंट: 02
अकाऊंट ऑफिसर: 03
अकाउंटंट: 24
सिक्युरिटी ऑफिसर – 08
असिस्ंटट सिक्युरिटी ऑफिसर – 12
असिस्ंटट सिक्युरिटी ऑफिसर (टेक्निकल) – 10
फिमेल स्टाफ नर्स – 01
ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर – 52
सिक्युरिटी असिस्टंट – 20
केअरटेकर – 05
हलवाई कुक – 11
मल्टी टास्किंग स्टाफ – 24
लायब्ररी अटेंडंट – 01

अर्ज कुठे करायचा?

गुप्तचर विभागाच्या वेबसाईटवर Bureau of Intelligence उमेदवारांना अर्ज करता येईल. अर्ज डाऊनलोड करुन त्याची प्रिंटआऊट काढून सर्व माहिती भरून पोस्टानं पाठवायचा आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत 21 ऑक्टोबर आहे.

अर्ज पाठवायचा पत्ता?

जॉईंट डेप्युटी डायरेक्टर/ इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, 35 एस पी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली – 110021.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!