Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SocialMediaUpdate : सहदेवच्या ‘बचपन का प्यार…’ वर बादशहा झाला खुश , दिले भेटीचे निमंत्रण !!

Spread the love

मुंबई- सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या   ‘जाने मेरी जानेमन बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे …’  या गाण्यावर अनेक जण फिदा झाले आहेत. खरे तर हा मूळ व्हिडीओ जवळपास दोन वर्ष जुना आहे. परंतु, पुन्हा एकदा तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता विशेष बातमी म्हणजे  हा व्हिडीओ पाहून बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाह याने व्हिडिओतील मुलाला भेटीचे  निमंत्रण दिले  आहे.

या विषयीची अधिक माहिती अशी कि , सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचा ओरिजनल व्हिडीओ दोन वर्षांपूर्वी युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. ज्यात एक शाळकरी मुलगा शाळेच्या गणवेशात त्याच्या शिक्षकांसमोर ‘बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’ गात आहे. या मुलाचं नाव सहदेव असून तो छत्तीसगड राज्यातील सुकमा येथील छिंदगड येथे राहतो. पुन्हा एकदा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार वायरल झाला. या व्हिडिओची लोकप्रियता इतकी वाढली की बादशाहने स्वतः त्याच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने सहदेवसोबत संपर्क साधला. बादशाहने मुलासोबत व्हिडीओ कॉलवर गप्पा मारल्या आणि त्याला चंदीगढला भेटायला बोलवलं. यानंतर बादशाह आणि सहदेव लवकरच एखाद्या गाण्यात एकत्र दिसण्याची शक्यता आहे.

दरम्यान व्हायरल झालेल्या या व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या अकाऊंटवर शेअर केलं आहे. नेटकऱ्यांसोबत अनेक कलाकारांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. परंतु, स्वतः बादशाहने सहदेवसोबत साधलेला संपर्क पाहता त्यांच्या व्हिडिओची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!