Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : चाळीसगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दोन अस्थिकलश सापडले

Spread the love

चाळीसगाव  : चाळीसगाव येथील  डॉ. आंबेडकर चौकात केलेल्या  उत्खननात डॉ. बाबासाहेब यांचे दोन  अस्थिकलश मिळाले असल्याची बातमी चाळीसगाव शहरात पसरताच या अस्थिकलशांचे दर्शन घेण्यासाठी आंबेडकर अनुयायांची मोठी गर्दी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण सुरू आहे. दरम्यान गुरुवारी  २२ जुलै रोजी दुपारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली उत्खनन सुरू असताना जवळपास १० फूट खाली काँक्रीटमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थि असलेले दोन  कलश सापडले आहेत.

यातील एका अस्थिकलशावर इंद्रायणीबाई पुंडलिक वाघ सायगाव  तर  दुसऱ्या कलशावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चाळीसगाव असा उल्लेख आहे. यावेळी समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल यांनी सांगितले, की त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक भगवान बागुल यांनी एका पेपरचे कात्रण दाखवून माहिती दिली होती की, ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले आणि ९ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार झाले. १० डिसेंबर रोजी क्रांतीसूर्यपूत्र  भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात जमलेल्या हजारो लोकांनी तेव्हा मुंडन केले होते. त्यात चाळीसगाव येथील शामाजी जाधव, सीताराम चव्हाण व चाळीसगाव येथील भिम अनुयायी यांनी हे अस्थीकलश चाळीसगावी आणले व १९६० साली या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला . त्यावेळी अस्थीकलश पुतळ्याच्या पायथ्याखाली ठेवले होते ते आज उत्खनन सापडले आहेत. हे अस्थीकलश सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन जागेवर पुतळ्याखाली विधीवत पूजन करून संध्याकाळी ७ वाजता लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!