Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : ठाकरे सरकारमुळेच ओबीसींचे आरक्षण गेले , देवेंद्र फडणवीस यांची टीका

Spread the love

राज्यात ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ , पंकजा मुंडे यांची मात्र अनुपस्थिती


मुंबई : भाजपाकडून राज्यात ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मात्र यावेळी महाराष्ट्र भाजप ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीला पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. आमच्या काळात ५०  टक्क्यांच्या वरचे आरक्षण टिकले  होते . या सरकारच्या काळात या सरकारला जे करायचे होते ते केले नाही. यांनी एक शपथपत्र  दिले असते तर सर्वोच्च नयालयाने हवा तेवढा वेळ दिला असता, असे  म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.


यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले कि , समाजातील जे वर्ग उपेक्षित होते  अशा लोकांना मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती दिली आहेत. त्याचबरोबर मोदींनी सरकारमध्ये आल्यानंतर त्यांनी ओबीसी आयोगाला संवैधनिक दर्जा दिला. त्यामुळे ओबीसी समाजासाठी  मोठ्या योजना सुरू झाल्या . अनेक महामंडळ ची निर्मिती आमच्या सरकारच्या काळात झाली. सर्व समाजाला संधी दिल्या शिवाय सर्व देशाचा विकास करता येत नाही हे आमचे ब्रीद वाक्य आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर हे लोकं खोटे बलातात. यांचे बोलके पोपट रोज बोलतात.

सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णय वाचला तर लक्षात येते की यांनी काहीच न केल्याने सर्वच आरक्षण गेले. जे काम आम्ही इतके महिने घसा फोडून सांगत होतो तेच आता करत आहेत, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आता काही लोक म्हणतात मी खोटं बोलतो. पण आरक्षण महाराष्ट्राला गेले. आता उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्या. तिथे आरक्षण मिळाले. त्यामुळे हा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरती लागू झाला, असंही ते म्हणालेत. इतकच काय तर काही गावांनी एका दिवसात डाटा दिला असल्याचं देखील त्यांनी सांगितले.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांची भेट झाली. या भेटीत ओबीसी आरक्षणावर चर्चा झाल्याचेही  त्यांनी सांगितले . परवा भुजबळ माझ्याकडे आले होते. मी त्यांना सांगितले की हा माझ्यासाठी राजकीय विषय नाही. हवी ती मदत करेल. तुमच्या नेतृत्वात करूया, आमची मागणी आहे फेब्रुवारीपर्यंत सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. आम्ही पाचही  जिल्ह्यात फक्त ओबीसी उमेदवारांना संधी  देऊ. भाजप ओबीसींना आरक्षण परत मिळेपर्यंत थांबणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले  आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!