Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच, पत्रकारांच्या प्रश्नाला पवारांनी दिली स्पष्ट उत्तरे !!

Spread the love

बारामती :  राज्याच्या विधानसभेचं अध्यक्ष काँग्रेसचाच राहील , त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबध नाही. असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला असून भास्करराव जाधव यांच्या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे. दरम्यान  केंद्र सरकारने निर्माण केलेल्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर येण्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. सहकार कायदे बनवण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या विधानसभेने कायदे केले आहेत. विधानसभेने केलेल्या कायद्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही’  अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यामुळे केंद्राच्या सहकार खात्याचा राज्यातील सहकार खात्यावर धाक राहील या चर्चेची हवाच पवारांनी काढून घेतली आहे.


पवार म्हणाले कि , केंद्र सरकार महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीवर गंडांतर आणेल या बातम्यांना फारसा अर्थ नाही. सहकार हा विषय घटनेनुसार राज्य सरकारचा आहे.’केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही. सहकार कायदे बनवण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या विधानसभेने कायदे केले आहेत. विधानसभेने केलेल्या कायद्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही’.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे राहील

आमचा तीन पक्षाचा निर्णय स्वच्छ झाला आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबध नाही. आम्हा तिन्ही पक्षाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत, असे  म्हणत शरद पवार यांनी भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्ष करण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

सामान नागरी कायद्याच्या  प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले , केंद्र सरकार याबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणे  योग्य राहणार नाही. निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे, केंद्र सरकार काय करतंय यावर आमचं लक्ष आहे.

आम्ही सरकार एकत्र चालवतो पक्ष नाही !!

राज्यातील काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले कि ,  प्रत्येक जण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करणार की नाही. त्यामुळे ते आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्नात असणार. आहे शिवसेनेने भूमिका घेतली, यात काहीही चुकीचं नाही. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही. पक्ष आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने चालवतो. प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार आहे. यात काहीही चुकीचे नाही. त्यामुळे यात गैरसमज असण्याचं काहीही नाही. सरकार एक विचारानं आहे की नाही हे महत्वाचं आहे. ते एक विचारानं काम करतात, असंही पवारांनी स्पष्ट केलं.

पावसाळी अधिवेशनामध्ये अभूतपूर्व असा गोंधळ पाहण्यास मिळाला. हा गोंधळ ज्यांनी केला त्यांना शिक्षा झाली, विधानसभेने त्यावर निर्णयही घेतला. आता ते काय काढायचंय जुनं उकरुन, ज्यांनी चुकीचं काम केलं असं विधानसभेला वाटलं, त्यांनी त्यांच्याबद्दल एक वर्ष शिक्षेचा निर्णय घेतला, असंही पवार म्हणाले.

नाना पटोले वगैरे ही लहान माणसं आहेत… !!

दरम्यान नाना पटोले यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर थेट टीका केली होती. ‘पुण्याचे पालकमंत्री हे बारामतीकर आहेत. त्यांच्याकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची कामं केली जात नाहीत, असा आरोप पटोले यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता, ‘या गोष्टीत मी पडत नाही. नाना पटोले वगैरे ही लहान माणसं आहेत, मी त्यांच्यावर कशाला बोलू? सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी बोललो असतो,’ असं पवार म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!