AhmadnagarNewsUpdate लसीकरण चालू असतानाच डॉक्टरांची आत्महत्या , सुसाईड नोट मध्ये दिले कारण…

Advertisements
Advertisements
Spread the love

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील कंरजी येथील आरोग्य केंद्रावर करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असतानाच तेथील डॉक्टरने आत्महत्या केली. उपकेद्रांतील आरोग्य अधिकारी डॉ. गणेश शेळके वय ४५, रा. बहिरवाडी, ता. नेवासा असे या डॉक्टरचे नाव आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि तालुका वैद्यकीय अधिकऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची सुसाइड नोट पोलिसांना आढळून आली आहे. वेळेवर पगार होत नाही, अतिरिक्त कामाचा ताण दिला जातो, असा उल्लेख डॉ. गणेश शेळके यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.

Advertisements

डॉ. गणेश शेळके करंजी आरोग्य उपकेंद्रात समुदाय अधिकारी म्हणून कार्यरत होते. आज सकाळपासून करंजी आरोग्य उपकेंद्रात करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होते. दुपारी डॉ. शेळके यांनी तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांकडे कागद व पेन मागितला. त्यानंतर त्यांनी केबिनचा दरवाजा बंद करून घेतला. बराच वेळ झाला तरी दरवाजा उघडला नाही, त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी डॉ. शेळके यांना आवाज दिला. मात्र, आतून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे उपस्थित कर्मचारी घाबरले. त्यांनी दरवाजा तोडला असता आतमध्ये डॉ. शेळके यांनी पंख्याला गळफास लावून घेतल्याचे आढळून आले.

Advertisements
Advertisements

दरम्यान पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी डॉ. शेळके यांचा मृतदेह काढून पुढील कार्यवाही सुरू केली. तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सकाळपासूनच डॉ. शेळेक तणावात दिसत होते. मात्र, त्याबद्दल ते काहीच बोलले नाहीत. लसीकरण सुरू असताना ते केबिनमध्ये बसून होते. दुपारी एकच्या सुमारास त्यांनी कर्मचाऱ्याला आवाज देऊन पेन व कागद मागितला. त्यानंतर त्यांनी दरवाजा बंद करून घेतला. त्यावेळी कोणालाही काही संशय आला नाही. बराच वेळ झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

दरम्यान, डॉ. शेळके यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामध्ये शेळके यांनी म्हटले आहे की, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत दराडे, तहसीलदार, जिल्हाधिकारी व प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करीत आहोत. वेळेवर पगार न मिळणे, अतिरिक्त कामाचा भार, असा त्रास होत असल्याचे डॉ. शेळके यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.

आपलं सरकार