Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात १४ हजार ३४७ रूग्ण कोरोनमुक्त , ९ हजार ७९८ नवीन रुग्ण

Spread the love

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासामध्ये राज्यभरात १४ हजार ३४७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ९ हजार ७९८ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, १९८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,९९,९८३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.७३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के एवढा आहे.


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९०,७८,५४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,५४,५०८ (१५.२४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,५४,४६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच, राज्यात आज रोजी एकूण १,३४,७४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारने राज्यातील निर्बंध हटवण्यासंदर्भात आणि दुसऱ्या लाटेत निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पंचस्तरीय पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. यानुसार निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात जिल्ह्यांचे  पाच गटात वर्गीकरण केले  जात असून, प्रत्येक आठवड्याला निकषानुसार यादी जाहीर केली जात आहे. पुढील आठवड्यातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातील जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दरम्यान राज्यात करोनाचा ग्राफ खाली येत आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे औरंगाबाद ,  मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक अशा प्रमुख शहरांत रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत असून करोना पॉझिटिव्हिटी रेटही खाली आला आहे.  राज्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता ९६ टक्क्यांच्या जवळ पोहचले आहे. राज्यात सध्या कोरोनाचे १ लाख ३४ हजार ७४७ रुग्ण आहेत. त्यात पुणेकरांना सर्वात दिलासा मिळाला आहे. सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने सर्वात वर राहिलेल्या पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्या आता मुंबईपेक्षा कमी झाली आहे. आरोग्य विभागाच्या आजच्या नोंदीनुसार मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या १८ हजार ७६४ सक्रिय रुग्ण आहेत तर पुणे जिल्ह्यात ही संख्या १७ हजार ८८८ इतकी आहे. मुंबई महापालिकेच्या नोंदीनुसार मात्र मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या सध्या १४ हजार ८६० इतकी आहे. ठाणे जिल्ह्यात १३ हजार ९७० तर कोल्हापूर जिल्ह्यात ११ हजार ४५३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

कोरोना : एक नजर

  • आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६ % एवढा आहे.
  • गेल्या २४ तासांत ९ हजार ७९८ नवीन रुग्णांचे निदान तर १४ हजार ३४७ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
  •  राज्यात आजपर्यंत एकूण ५६,९९,९८३ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यशस्वी.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७३% एवढे झाले आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९०,७८,५४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,५४,५०८ (१५.२४टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
  • सध्या राज्यात ८,५४,४६१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ४,८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!