Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaReservationUpdate : खा. संभाजी छत्रपती यांनी केली मराठा मूक आंदोलनाची जय्यत तयारी

Spread the love

कोल्हापूर :  खा. संभाजीराजे छत्रपती यांनी घोषित केल्याप्रमाणे मराठा आरक्षणावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  बुधवारी  रोजी कोल्हापूर  येथे मूक आंदोलन  होणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली सुद्धा जाहीर केली आहे. पाहूयात कशी आहे आंदोलनाची रूपरेषा आणि नियमावली. उद्या शाहू महाराजांच्या समाधी स्थळावर अभिवादन करून मराठा क्रांती मूक आंदोलनाला सुरूवात होणार आहे.

मराठा क्रांती मूक आंदोलनाची रूपरेषा

9:00 – पर्यंत महाराष्ट्रातील सर्व समन्वयकांनी आंदोलन स्थळी पोहचणे
9:50 – समन्वयक, तरादुत, नोकर भरतीची मुले आणि लोकप्रतनिधींनी स्थानापन्न होणे

10:00 – छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यानंतर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात.

10:10 – लोकप्रतिनिधींनी राजशिष्टाचारनुसार मनोगत किंवा आपापली जबाबदारी निश्चित करण्यास सुरुवात करतील.

1:00 – राष्ट्रगीताने मराठा क्रांती मूक आंदोलनाची सांगता.

1:15 – महाराष्ट्रातील समन्वयक आणि जिल्हा समन्वयक यांच्यासोबत लाँग मार्च संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक. श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती मार्गदर्शन करतील.

दरम्यान मोर्चात सहभागी होणाऱ्यांनी कोरोनाविषयक नियमावलीचे पालन करण्यासाठी संभाजीराजे यांनी नियमावलीही  जारी केली असून त्याचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हि नियमावली पुढीलप्रमाणे

सर्वांची वेशभूषा काळ्या रंगाची असावी, प्रत्येकाने दंडावर काळी फीत बांधून येणे, प्रत्येकाने काळा मास्क वापरावा, शक्यतो सोबत येताना सॅनिटायझर आणावे, आंदोलनाच्या स्थळी आपल्यामुळे इतरांना त्रास होईल, असे कोणतेही वर्तन करू नये, कोरोनाच्या नियमांचे पालन करावे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!