Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiCrimeUpdate : धक्कादायक : इंस्टाग्रामवर मैत्री झालेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

Spread the love

मुंबई : मुंबईत  एका अल्पवयीन मुलीवर एका रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी गँगरेप झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आणि आरोपींची मैत्री ही इंस्टाग्रामवर झाली होती. या  अल्पवयीन मुलीवर एका रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार आणि गँगरेप झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून दोन आरोपींचा शोध अद्याप सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना ३१  मे आणि १ जूनच्या रात्री घडली. १६ वर्षांच्या मुलीच्या कुटुंबियांनी मालाड पश्चिमच्या पोलीस स्टेशनमध्ये तिच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पीडित मुलगी अल्पवयीन असल्यानं पोलिसांनी तात्काळ अपहरणाची तक्रार दाखल करत तपास सुरु केला. दरम्यान दुसऱ्या दिवशी दुपारी पीडित मुलगी स्वतःहून घरी परतली. ज्यावेळी ती घरी परतली तेव्हा खूप घाबरलेली आणि कमजोर दिसत होती. पीडित मुलीची तिच्या आई-वडिलांनी विचारपूस केली. मात्र तिने  काही सांगितले  नाही. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांची टीम तिच्या घरी पाठवण्यात आली. सुरुवातीला पोलिसांनाही पीडित मुलीनं काही सांगितलं नाही. मात्र त्यानंतर तिने  घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

इंस्टाग्रामवर पीडित मुलीची मैत्री काही मुलांसोबत झाली होती. त्यापैकी एका मित्रानं बर्थडे पार्टी ठेवली होती. सर्वजण मड भागातल्या एका हॉटेलच्या बाहेर भेटले आणि तिथे त्यांनी बर्थडे सेलिब्रेट केला. त्यानंतर कारमध्ये ही एक केक कापण्यात आला. तेव्हा इंस्टाग्रामवरील दोन मित्रांनी पीडितेला कारमध्ये नेलं आणि तिच्यावर गँगरेप केला. या घटनेनंतर पीडित मुलीला मालाडमधील एका दुसऱ्या मित्राच्या घरी सोडण्यात आले . येथेही तिच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडित मुलगी घरी न जाता आपल्या एका मित्राच्या घरी गेली. तिथे देखील मित्रानं तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि गँगरेप करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी १८ ते २३ या वयोगटातील आहेत. पोलिसांनी सांगितले  की, सर्व जणांची इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. दोन आरोपींचा अजूनही शोध सुरु आहे. तसंच सर्व आरोपींना पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!