MaharashtraNewsUpdate : कोल्हापुरात १६ जूनला मराठा समाजाच्या पहिला मोर्चा, खा. संभाजीराजे छत्रपतींची गर्जना

Advertisements
Advertisements
Spread the love

रायगड  : रायगडावर आयोजित शिवराज्यभिषेक सोहळ्यात  खासदार संभाजी छत्रपती यांनी रायगडावरून मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशी गर्जनाच  करताना ज्या छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिलं होतं त्याच शाहू महाराजांच्या कोल्हापुरात १६  जून रोजी पहिले आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही संभाजीराजेंनी केली.

Advertisements

यावेळी बोलताना खा. संभाजी राजे म्हणाले कि , माझा लढा ७० टक्के गरीब मराठ्यांसाठी आहे. आपलेच पुढारी कोण चुकलं-कोण बरोबर या स्पर्धेत लागले. मागच्या सरकारचे लोकं म्हणाले आत्ताच्या सरकारने मांडणी बरोबर केली नाही. आत्ताचं सरकार म्हणतंय तुम्ही कायदा बरोबर केला नाही. मी मोठा की तू मोठा, हेच चाललं आहे. आमची मागणी एकच आहे, आम्हाला न्याय द्या. कोण चुकलं त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही.

Advertisements
Advertisements

लढाई आपल्यामध्येच कशाला करायची, मी काही राजकारणी नाही, राजकारण करणार नाही, मराठा समाजाला वेठीस धरणार नाही, धरायचंही नाही, जर काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, दिशाभूल करण्याचं रक्त आमच्यात नाही, असं म्हणत खासदार संभाजीराजे  यांनी रायगडावरून मराठा समाजाला आश्वासन दिलं.

मराठा समाजाचा मागण्या मान्य न झाल्यास मुंबई ते पुणे लाँग मार्च काढणार, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला आहे. तिथे तुम्हाला लाठी मारायची असेल, तर पहिली लाठी संभाजी राजेला मारावी लागेल. छत्रपतींच्या वंशजावर पहिली लाठी मारावी लागेल. आम्हाला गृहीत धरू नका. आपण मराठा आरक्षणाचा  लढा देत आहोत. काही लोकं नाराज झाले तरी चालतील, पण समाजाला वेठीस धरणार नाही, कुणाचाही दिशाभूल करणार नाही. पण, आपल्याला समाजाला दिशा देण्याचे काम करायचे आहे. आता कोणी कितीही नाराज झाले तरी चालतील, शिवाजीराजे यांनी जे समाजासाठी कार्य केले होते, तेच आपल्याला पुढे न्यायचे आहे. पण आता कोरोनाचं संकट असल्यामुळे आपल्याला काहीच करता येत नाही.

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. नेते आणि मंत्री एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तुम्ही  खेळ सुरू केला आहे, मी खेळ होऊ देणार नाही. आमचा संयम तुम्ही पाहिला, पण आता काही झाले तरी मागे हटणार नाही. मी मेलो तरी चालेल पण, मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला.

आपलं सरकार