Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : किती वाईट ? कोरोना मृत्यूच्या बाबतीत महाराष्ट्राचे नाव “टॉप टेन” देशाच्या यादीत !!

Spread the love

मुंबई : राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे सांगितले जात असले तरी महाराष्ट्रासाठी कोरोनाची दुसरी लाट सर्वाधिक दुःखदायक यासाठी ठरत आहे कि , या लाटेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा एक लाखाच्या पार होणार आहे. विशेष बाब म्हणजे जगभरात केवळ ९ देश असे आहेत, जिथे कोरोनामुळे एक लाखाहून अधिकांनी प्राण गमावले आहेत. रविवारची आकडेवारी समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या नावावर हा टॉप टेन मध्ये जाण्याचा वाईट रेकॉर्ड नोंदवला जाण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ५८, १९, २२४ आणि मृतांची संख्या ९९, ५१२ वर पोहोचली आहे. राज्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या २०,००० पेक्षा कमी आली आहे. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या १, ८८, ०२७ इतकी असून त्यांच्यावर उपाचार सुरू आहेत. दरम्यान शनिवारच्या आकडेवारीनुसार, देशभरात कोरोनामुळे ३ लाख ४६ हजार हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. देशातील एकूण मृतांच्या संख्येतील २९ टक्के मृत रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

राज्यात शनिवारी कोरोनाचे १३ हजार ६५९ नवे रुग्ण आढळले आहेत. ही संख्या १० मार्चनंतरची सर्वात कमी संख्या होती. या दरम्यान राज्यात ३०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत ९९ हजार ५१२ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यामुळे सोमवारपर्यंत राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा एक लाखाच्या पार जाण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत या ९ देशांमध्ये एका लाखाहून अधिक मृत्यू

वर्ल्डओमीटर या वेबसाईटने  आणि जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या कोविड ट्रेकरनुसार,  दिलेल्या माहितीनुसार जगभरात केवळ ९ देश असे आहेत जिथे एका लाखाहून अधिकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. यात भारताचाही समावेश आहे. हे टॉप ९ देश पुढील प्रमाणे आहेत. 

१. अमेरिका ६ लाख १२ हजार २०३
२. ब्राझील ४ लाख ७२ हजार ६२९
३. भारत ३ लाख ४६ हजार ७८४
४. मेक्सिको २ लाख २८ हजार ७५४
५. पेरू १ लाख ८६ हजार ०७४
६. युके १ हजार २७ हजार ८३६
७. इटाली १ लाख २६ हजार ४७२
८. रशिया १ लाख २३ हजार ७८७
९. फ्रान्स १ लाख ०९ हजार ९७३
१०. महाराष्ट्र ९९ हजार ५१२

आपलं सरकार

Click to listen highlighted text!