Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : दिलासादायक : राज्यात नव्या रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक

Spread the love

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात आज १५ हजार २२९ नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर  एकूण २५ हजार ६१७ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्याही काहीशी वाढल्याचे चित्र आहे. आज दिवसभरात ३०७ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज मृत्यूत किंचित वाढ दिसत असली तरी राज्यातील मृत्यूदर १.६८ टक्के इतका आहे. आतापर्यंत एकूण ५४ लाख ८६ हजार २०६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७३ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख ४ हजार ९७४

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख ४ हजार ९७४ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी ती घटत आहे. पुण्यात एकूण २६ हजार ४४३ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १८ हजार २४५ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १६ हजार ७४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १९ हजार ०६८ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ९ हजार ७१९ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार १९४ इतकी आहे. या बरोबरच अहमदनगरमध्ये ९ हजार ०४८ इतकी आहे. औरंगाबादमध्ये ३ हजार ५८५, नांदेडमध्ये ही संख्या १ हजार ७५३ इतकी आहे. जळगावमध्ये ३ हजार ३३३, तसेच तर रायगडमध्ये एकूण ५ हजार २०६ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ३ हजार ८३६, तर, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गोंदिया जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ६०१ इतकी आहे.

१५,६६,४९० व्यक्ती होम क्वारंटाईन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ५७ लाख ७४ हजार ६२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७ लाख ९१ हजार ४१३ (१६.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १५ लाख ६६ हजार ४९० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, ७ हजार ०५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!