Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्ण संख्येत दुप्पट वाढ

Spread the love

मुंबई : राज्यात आज दिवसभरात राज्यात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा दुपटीहून अधिक रूग्ण करोनातून बरे झाल्याचे दिलासादायक वृत्त समोर आले आहे. राज्यात आज १५ हजार ७७ नवीन करोनाबाधित आढळले असून, ३३ हजार रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, १८४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

दरम्यान राज्यात आजपर्यंत एकूण ५३,९५,३७० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९३.८८ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.६६ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५०,५५,०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,४६,८९२ (१६.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८,७०,३०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १०,७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण २,५३,३६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!