Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : शरद पवार -मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक

Spread the love

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  नेते  शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांची  सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी  भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांच्यातील हि बैठक जवळपास ४० मिनिटे बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गेले काही दिवस आजारी असलेले शरद पवार यांनी आज खूप दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र  या बैठकीत या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकली नाही. या बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडी तसेच केंद्र सरकारकडून राज्याला कोविड 19 संसर्गाच्या काळात मिळणारी तोकडी मदत यावर चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळपास 40 मिनिटे बैठक झाली. सायंकाळी 5.30 ते 6.10 वाजेपर्यंत या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. राज्यातील एकूणच कोरोना संसर्गाची परिस्थिती, राजकीय घडामोडी तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. बैठकीच्या संदर्भात अधिकृत माहिती मिळाली नसली तरी मराठा समाजाला विश्वासात कसे घ्यायचे  या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!