Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaInformationUpdate : हवेतून पसरणाऱ्या कोरोनाच्या विषाणूपासून असा बचाव करा…

Spread the love

आपण हे वाचले असेल कि ,  गेल्या महिन्यात ‘द लॅन्सेट’ या सायन्स नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोना अर्थात  SARS-CoV-2 व्हायरस हा हवेतून पसरत असल्याचे  प्रबळ पुराव्यातून सिद्ध झाले होते.  त्यानुसार कोरोना हवेतून परसतोय आणि त्याचे सातत्याने पुरावे संशोधकांना मिळत आहेत असे त्याच्या एका निवेदनात सांगण्यात आले  होते . आता अमेरिकेच्या सीडीसीच्या दाव्याने द लॅन्सेटच्या या संशोधनाला पृष्टी मिळाली आहे.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कन्ट्रोल अॅन्ड प्रिवेन्शन अर्थात  CDC च्या  दाव्यानुसार , आपण ज्या वेळी बोलतो त्यावेळी आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या सूक्ष्म द्रव्य कणांमुळे कोरोनाचा प्रसार होत आहे. म्हणजेच आपल्या तोंडावाटे अत्यंत सूक्ष्म असे द्रव्य कण बाहेर पडतात आणि ते हवेत मिसळतात किंवा जवळच्या पृष्ठभागावर बसतात. नंतर त्या सूक्ष्म द्रव्य कणांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होतो असा दावा  CDC ने केला आहे. त्यावरून CDC ने शुक्रवारी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यामध्ये सांगण्यात आले आहे की, आपण बोलताना आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या सूक्ष्म द्रव्य कणांच्या मार्फत कोरोनाचा प्रसार होत असल्याचे  स्पष्ट झाले आहे. तोंडावाटे निघणारे मोठे द्रव्य कण हे काही सेकंद ते मिनीटे हवेत राहतात आणि नंतर नष्ट होतात. पण सूक्ष्म कणांचे  वेगळे  आहे. ते काही मिनीटे ते काही तास हवेमध्ये वा पृष्ठभागावर राहतात. त्यामुळे सूक्ष्म कणांपासून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका वाढतो.

ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा या देशातील सहा तज्ज्ञांनी सांगितले  की, कोरोना हवेतून पसरत असल्यानेच जगभरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांना त्याच्यावर अद्याप नियंत्रण ठेवता येणे  शक्य झाले नाही. कोरोनाचा प्रसार हा हवेच्या माध्यमातून होतोय या दाव्यासाठी या संशोधानात दहा ओळींचे पुरावे देण्यात आले आहेत. या आधीही काही वैज्ञानिकांनी दावा केला होता की कोरोनाचा प्रसार हा प्रामुख्याने हवेच्या माध्यमातून होतो पण त्यांच्या हा दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे नव्हते.

मास्क हाच प्रभावी उपाय 

दरम्यान  कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असून त्यावर मास्क हाच प्रभावी उपाय असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेत काही दिवसांपूर्वी डबल मास्कबाबत सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेन्शन (CDC) ने याबाबत परीक्षण केले    , यामध्ये अशी माहिती मिळाली की डबल मास्क वापरल्याने कोरोना व्हायरसचा फैलाव 95 टक्के रोखला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी डबल मास्क घातला तर स्थितीत मोठ्या प्रमाणावर सुधार होईल. याच परीक्षणाच्या आधारे काही दिवसांपासून अनेक आरोग्य तज्ज्ञ लोकांना डबल मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत.

डबल मास्क कसा वापराल ?

  • दोन सर्जिकल मास्क असल्यास ते अशा पद्धतीने लावा की तोंड आणि नाक नीट झाकले जाईल. मात्र दोन सर्जिकल मास्क लावण्याचा सल्ला सहसा दिला जात नाही.
  • एक कापडी मास्क आणि एक सर्जिकल मास्क असल्यास प्रथम सर्जिकल मास्क लावावा आणि त्यावर कापडी मास्क लावावा.
  • जर N-95 मास्कचा वापर करत असाल तर तुम्हाला डबल मास्कची गरज लागणार नाही. कारण कोरोना विषाणूंपासून संरक्षणासाठी N-95 मास्क चांगल्या दर्जाचा आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • सर्जिकल मास्कचा वापर केवळ एकदा केला जाऊ शकतो.
  • सर्जिकल मास्क वापरल्यानंतर त्याची व्यवस्थितरित्या विल्हेवाट करावी.
  • कापडी मास्क वापरत असाल तर तो मास्क रोज गरम पाण्यात धुवा.
  • मास्क काढत असता बोलणे टाळा. मास्क काढल्यानंतर हात सॅनिटाईज करा.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!