Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak Live Update : चर्चेतली बातमी : राज्याला लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही , मुख्यमंत्री आपल्या भूमिकेवर ठाम

Spread the love

येत्या 12 ते 18 एप्रिल या काळात दोन सार्वजनिक सुट्ट्या आहेत. यामुळे फक्त गुरुवार आणि शुक्रवार दोनच दिवस अधिकृत कामाचे असणार आहेत. त्याला लागूनच पुढील शनिवार आणि रविवार विकेंडचा लॉकडाऊन सुरू होणार आहे. यामुळे दोन दिवसांसाठी नागरिकांची कामाच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सलग लॉकडाऊन केला तर नागरिकांची गर्दी टाळता येईल आणि लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करता येईल असे मुख्यमंत्र्यांचे मत आहे.


मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक पार पडली. कोरोना विषाणूची साखळी तोडायची असेल तर सलग 10, 15 किंवा 21 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. या बैठकीत कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. ‘जनतेला समजावू शकतो पण करोनाला समजावू शकत नाही’असे  मुख्यमंत्र्यांनी म्हटले  आहे.

जनतेच्या उद्रेकाची भीती : देवेंद्र फडणवीस

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण लॉकडाऊन केल्यास जनतेच्या उद्रेकाची भीती व्यक्त केली. सरकारने कठोर निर्णय घ्यावा पण ज्यांचे  हातावर पोट आहे त्यांचा आधी विचार करावा. त्यांच्यासाठी आर्थिक पॅकेज द्यावे अशी मागणी त्यांनी केली. सरकारला आम्ही सहकार्य करू पण त्यासाठी तुम्हीच पुढाकार घ्या आणि तुमच्या मंत्र्यांना समज द्या, असेही फडणवीस म्हणाले. मंत्री अशोक चव्हाण यांनी लॉकडाऊनबाबत मध्यम मार्ग काढण्याची सूचना केली. अचानकपणे लॉकडाऊन न लावता लोकांना दोन तीन दिवस आधी त्याबाबत कल्पना द्यावी, असेही ते म्हणाले.

थोडा वेळ सर्वांना कळ सोसावी लागेल

बैठकीच्या शेवटी आपला निर्णय काय… कडक लॉकडाऊन पण आणि जनतेच उद्रेक यामध्ये मार्ग काढावा लागेल. थोडा वेळ सर्वांना कळ सोसावी लागेल. जनतेला समजावू शकतो पण करोनाला समजावू शकत नाही. मी ज्या सर्वांशी चर्चा केली त्यांना सर्वांनी सहकार्य केले . याला काही अवधी लागेल एक दोन दिवसात व्यापारांचा प्रश्न सोडवू. नाही तर सर्व काही सुरू ठेवले तर  जे काही अनर्थ ओढवेल त्याला सामोर जावे  लागेल.

किमान 15 दिवसांचा लॉकडाऊन करावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, हे जेवढ्या लवकर आपण थोपवू तेवढे  आपण आपण हे संक्रमण रोखू शकू. माझे  मत आहे की किमान 15 दिवस लॉकडाऊन करावा. तुम्ही तुमचं मत सांगा. माझे हे म्हणणे  नाही की महिना दोन महिना लॉकडाऊन करा, पण आपण हळूहळू एक एक घटक सुरू करू शकतो पण सुरुवात तर करू.

लॉकडाऊनची वेळ आली आहे

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी म्हटले कि , कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही व्यक्तींमध्ये कोविडची लक्षण दिसत आहेत. या संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोललो आहे. कोरोनाची साखळी आपल्याला तोडायची आहे. आरोग्य सुविधा वाढवणे गरजेचे  आहे. पण आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. मध्यंतरीचा काळ बरा होता. सर्व व्यवहार सुरू झाले होते. पण पुन्हा एकदा संसर्ग सुरू झाला आहे. आता तर तरुण वर्ग बाधित आढळतोय. आपण सर्वांना लस देण्याची मागणी करत आहोत.

मंत्रालयातून राज्याचा कारभार चालतो तेथेही परिस्थिती गंभीर आहे. गेल्या वेळी आपण रेल्वे बसेस बंद केल्या होत्या. फेब्रवारीपर्यंत इतर राज्यांचे  आणि आपले  चित्र सारखे  होते  पण विदर्भात चित्र बदलू लागले आहे. तेथे जो व्हायरसचा स्ट्रेन आढळला त्यामुळे तीव्रता वाढली. या नव्या स्ट्रेनची माहिती आपल्याला आधीच मिळाली असती तर परीस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले असते असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

सर्वपक्षीय बैठकीत महत्वाचे मुद्दे

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही व्यक्तींमध्ये कोविडची लक्षण दिसत आहेत. या संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोललो आहे – मुख्यमंत्री

कोरोनाची साखळी आपल्याला तोडायची आहे – मुख्यमंत्री

आरोग्य सुविधा वाढवणं गरजेचं आहे. पण आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे – मुख्यमंत्री

मध्यंतरीचा काळ बरा होता. सर्व व्यवहार सुरू झाले होते. पण पुन्हा एकदा संसर्ग सुरू झाला आहे – मुख्यमंत्री

आता तर तरुण वर्ग बाधित आढळतोय. आपण सर्वांना लस देण्याची मागणी करत आहोत – मुख्यमंत्री

‘आपल्याला आता एकमुखी निर्णय घ्यावा लागेल’ – मुख्यमंत्री

‘महिनाभराच्या आत आपण या परीस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो, त्यासाठी आपण एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे’ – मुख्यमंत्री

कडक लॉकडाऊन लावण्याच्या राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे देखील सहभागी होते.

सर्वपक्षीय बैठक 

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाच्या उद्रेकावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक  बोलावली आहे. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात  या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , मनसे अध्यक्ष राज ठाकरे , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. संध्याकाळी 5 वा. या बैठकीला सुरुवात झाली.


दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो  याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यावेळी राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याबाबत गांभीर्यानं विचार केला जाणार असल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांची प्रतिक्रिया 

राज्यात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू न करता काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. याविषयी बोलताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला आवाहन केलं आहे. “मलाही कळतंय की गेल्या अनेक महिन्यांपासून सगळ्यांनाच करोनामुळे त्रास होतोय. त्यामुळे काहींच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. पण कोरोनाची साखळी तोडणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सगळ्यांनीच एकमेकांना कोणत्याही प्रकारचं राजकारण न आणता सहकार्य करायला हवं. केंद्र आणि राज्य सरकारने एकमेकांवर टोलवाटोलवी न करता काम करायला हवं”, असं अजित पवार म्हणाले आहेत. पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!