Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : कोरोनामुळे सुटी असलेल्या पोलिसांना कामावर असल्याचे फायदे मिळणार : पोलिस महासंचालक

Spread the love

औरंगाबाद – कोरोनामुळे सुटीवर असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचे सुटी घेतलेले दिवस कामकाजाच्या दिवसात घेण्याचा विचार आम्ही  करीत  आहोत अशी माहिती पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली.

महाराष्ट्रात कोरोनामुळे हजारो अधिकारी आणि कर्मचारी क्वारंटाईन होण्यासाठी सुटी घेत असतात. त्या सुट्या त्यांच्या रजे मधे समाविष्ट केल्या जातात.पण शासनाच्या इतर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी जर कोरोनामुळे सुटीवर गेले तर त्यांचे क्वारंटाईन असलेले दिवस कामकाजाच्या दिवसात समाविष्ट केले जातात.पाेलिसांचा त्यांच्या कामाच्या स्वरुपामुळे काेराेनाग्रस्तांशी व लाेकांशी सतत संपर्क येत असल्याने ते व त्यांचे  कुटुंबीय काेराेनाला बळी पडत असतात. त्यामुळे, काेराेनाच्या उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे वागते वा क्वारंटाईन हाेणे भाग पडते.

वास्तविक पाहता, पाेलिसांचा काेराेनावरील उपचार कालावधी हा कर्तव्य कालावधी म्हणून गणला जाणे आवश्यक आहे. परंतु पाेलीस दलात मात्र हा काेराेनाचा उपचार कालावधी त्यांच्या अर्जित वा वैद्यकीय रजेतून वजा केला जाताे किंवा रजा म्हणूनच धरला येताे. पण, शासनाच्या शिक्षण विभागाने मात्र ही महामारीची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हा काेराेना उपचाराचा कालावधी कर्तव्य कालावधी म्हणून गणण्यासंबंधी आदेश काढले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.

वस्तुत: पाेलिसांसाठीही अशाच प्रकारचा आदेश निघण्याची गरज आहे. बंदोबस्तावरील लाेकसंपर्कामुळेच त्यांना काेराेना हाेताे. तेव्हा, पाेलिसांचा काेराेना उपचार कालावधी हा कर्तव्य कालावधीच समजला गेला पाहिजे याचा विचार पोलिस महासंचलनालय करत असल्याचे शेवटी सेठ म्हणाले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!