Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात लवकरच लॉकडाऊनची घोषणा , मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Spread the love

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग संसर्ग लक्षात लक्षात घेता घेता ‘मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती ( एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणे करून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल,’ असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिले आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच लॉकडाऊनची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील काही शहरात आणि जिल्ह्यात लॉकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी सर्वच जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य शासन अधिकच कठोरपणे निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर आज वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि कोविड टास्क फोर्स यांच्यासोबत पार पडलेल्या बैठीकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर लॉकडाउनच्यादृष्टीने सूचक इशारा देखील दिल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान लोकांना कोरोनापेक्षा देखील आपली चाचणी पॉझिटिव्ह आली तर कुठल्याही विलगीकरण केंद्रात नेऊन टाकले जाईल व आपल्याला तिथे सुविधा मिळणार नाही अशी भीती आहे, ती त्वरित काढणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामीण भागात सुविधा नसतील तर नजीकच्या शहरातील किंवा परिसरातील सुविधा मिळावी अशी व्यवस्था करा, तसेच केवळ मुंबई-पुणे यावर लक्ष केंद्रित न करता राज्याच्या सर्व भागात विलगीकरण सुविधा तसेच आरोग्य सुविधा कमी पडणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

बैठकीतील मोठे निर्णय

– प्रशासनाने लॉकडाऊनची तयारी करावी

– ऑक्सिजनची महत्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा

– ह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणकरण्यावर भर द्यावा

– मृत्यू पुढे जाऊन वाढू शकतील त्यामुळे ई आयसीयू , व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे

– प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी

– विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत

– सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे

यावेळी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ग्रामीण भागात रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्काचा शोधअधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त केली.
कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिरा रुग्णालयांत पोहचत आहेत ही चिंतेची बाब आहे. अगदी 10 ते 18 वयोगटात देखील मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसत असून पुढील काळात तरुणांमध्ये देखील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!