Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोरोनाच्या नावाखाली खासगी रुग्णालयांकडून नफेखोरी , बाहेरील औषधाला नकार , रुग्णांची लूट !!

Spread the love

ब्रँडेड जेनेरिक औषधांची गुणवत्ता आणि दर्जा सारखाच , केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा आदेश धाब्यावर


औरंगाबाद । ब्रँडेड औषधी आणि जेनेरिक औषधी यात कुठलाही फरक नसल्याचे पत्र केंद्रीय आरोग्य कल्याण मंत्रालयाने दिलेले असतानाही खासगी हॉस्पिटलकडून ब्रँडेड औषधांचाच आणि त्यांच्याच मेडिकल स्टोअरमधून घेण्याचा आग्रह केला जात असल्याने रुग्णांची मोठी लूट होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून संबंधित रुग्णालय व्यवस्थापनांना समज देण्याची आणि त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. बाहेर बाजारात कोरोनावरील औषधी ८० रुपयापासून ते १४०० रुपयापर्यंत असताना खासगी रुग्णालयात मात्र अव्वाच्या सव्वा किंमत लावून मोठ्या प्रमाणात नफेखोरी केली जात आहे.

 


रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमतीत घट पण लूट चालूच !!

कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी वापरण्यात येणारे Remdesivir (100mg) इंजेक्शनची किंमत Mylan कंपनीने आपली MRP 5400/-  असताना आता Rs 595 +72 gst=662 /- रुपयात विक्री करण्याचे पत्रक जरी केले आहे. गेल्या वर्षी राज्यात या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाला होता. याच काळात लोकांनी मूळ किंमतीपेक्षा अधिकचे पैसे मोजून हे इंजेक्शन खरेदी केले होते. त्यामुळे या इंजेक्शनची किंमत कमी करावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. दरम्यान एकीकडे कोरोनाच्या औषधांमध्ये मोठी नफेखोरी आणि काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत असतांना  या निर्णयामुळे हजारो रुग्णांचे जीव वाचणार आहेत. तसेच  कोरोनाविरुद्धची लढाई आणखी सक्षमपणे लढता येईल. मात्र रुग्णांच्या मजबुरीचा फायदा घेऊन खासगी रुग्णालयात मोठी लूट होत आहे. 


या बाबत सामान्य जनतेला स्वस्तात औषधी देण्यासाठी मोहीम उघडणारे निझामाबाद येथील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम सोमाणी यांना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने पत्र  देऊन कळविले आहे कि ,  जेनेरिक औषधी आणि ब्रँडेड औषधी यांच्या गुणवत्तेत कोणताही फरक नसून दोन्हीही औषधांचा दर्जा आणि गुणवत्ता पूर्णतः समान आहे . त्यामुळे जेनेरिक औषधींचा वापर केल्यास रुग्णांची ८० ते ९० टक्केपर्यंत खर्चात बचत होईल.

केंद्र शासनाच्या या परिपत्रकामुळे जेनेरिक औषधी  प्रधानमंत्री जन औषधी दुकानांवरून खरेदी केल्यास ९० टक्के पर्यंत स्वस्तात औषधी उपलब्ध होऊ शकते. बाजारात ब्रँडेड म्हणून जी औषधी विकण्यात येत आहे त्यावर 7000%  पर्यंत एमआरपी प्रिंट करण्यात येत आहे त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. कोरोना संसर्गाचा गैरफायदा घेण्यासाठी अनेक औषध विक्रेते कोरोनासाठी लागणाऱ्या  Remdisiver इंजेक्शनवर मोठा नफा कमावत आहेत वास्तविक हेच जेनेरिक इंजेक्शन  ज्यावर  एमआर पी 5400 लिहिलेले असताना  हे इंजेक्शन  1000/1200 रुपयात देत आहेत . वास्तविक असेच Meropeninum  हे इंजेक्शन 3000 MRP असलेले  300 रुपयात दिले जात आहे. त्यामुळे रुग्णांनी जेनेरिक औषध खरेदी करण्याची गरज आहे. जेणेकरून त्यांची लूट होणार नाही. हि औषधी आपल्या जवळ कुठे उपलब्ध आहे याची माहिती गुगलवर सहजपणे मिळू शकेल.

वास्तविक सर्वच औषधांवर खरी एमआरपी प्रिंट करावी आणि लोकांची लूट थांबवावी यासाठी  पुरुषोत्तम सोमानी  गेल्या  30 महिन्यांपासून प्रयत्नशील आहेत. असे केल्यास औषध कंपन्यांची एमआरपी  90  टक्केपर्यंत कमी होऊ शकते. ज्याचा लाभ  135 कोटी जनतेला होऊ शकतो. मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार याकडे लक्ष देत नसल्याने जनतेची लूट करण्यात येत आहे. हि लूट थांबवण्यासाठी एक तर लोकांनी प्रधानमंत्री जेनेरिक जनौषधी खरेदी करावीत किंवा केंद्र सरकारवर एमआरपीवर नियंत्रण आणण्यासाठी दबाव वाढवण्याची गरज आहे.

कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरलेल्या  रेमडेसिवीर या औषधाच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन आता फक्त 900 रुपयांना मिळणार आहे. रेमडेसिवीरची किंमत 2800 रुपये होती. दरम्यान रेमडेसिवीर बनवणाऱ्या झायडस कॅडिला या कंपनीने औषधाची किंमत 70 टक्क्यांनी कमी केली आहे.  हेच इंजेक्शन मायलन या बंगळूरु येथील कंपीनीकडून सरकारला 600 रुपयांमध्ये देण्यात येणार आहे मात्र खासगी रुग्णालयांतून मूळ किमतीवरच या इंजेक्शनची विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!