MahanayakSpecial : राज्यात दोन आठवड्यात येतेय एसआयडीची नवीन टीम, एसआयडी आयुक्तांची माहिती

Advertisements
Advertisements
Spread the love

महासंवाद एसआयडी | जगदीश कस्तुरे

Advertisements

राज्यात येत्या दोन आठवड्यात SID घ्या १८० नव्या अधिकार्‍यांची टीम कार्यरत होईल अशी माहिती स्टेट इंटिलिजन्स च्या आयुक्तांनी ‘महानायक आॅनलाईन’ शी बोलताना दिली.


देशात महाराष्र्ट हे असं एकमेव राज्य आहे.की आपल्या राज्यात स्टेट इंटिलिजन्स अॅकंडमी पुण्यात आहे. अशी अॅकॅडमी फक्त आय.बी. साठी असते २००५ साली आयपीएस अधिकारी व्ही.एन. देशमुख यांनी शासनाला प्रस्ताव पाठवला होता. की, स्टेट इंटीलिजन्समधे स्वतंत्र अधिकार्‍यांची भरती करावी.त्यांचे ट्रेनिंगही वेगळ्या पध्दतीने करण्यात यावे. हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर २००९आणि २०१९मधे नवीन अधिकार्‍यांच्या जागा भरण्यात आल्या.त्यावेळी व्ही शिवानंदन आयुक्त होते. एसआयओ आणि एआयओ अशा दोन पदांसाठी भरती झाली.आता पर्यंत पाच ते सहा बॅचेस भरती झालेल्या आहेत.यामधे एसआय अधिकारी पोलिस खात्यातून घेतले जातात तर एआय अधिकारी थेट भरतीमधून निवडले जातात. स्टेट इंटिलाजन्स ला पुरेसा निधीही शासनाकडून मिळतो. दुसर्‍या एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, आम्हाला प्रशासनाला माहिती देतांना शक्यता या शब्दाचा वापर करावाच लागतो. त्याचे कारण भविष्यात घडण्यात येणार्‍या घटना नेमक्या कशा स्वरुपात असतील याबाबत अंदाज बांधणं योग्य वाटंत नाही.त्याचप्रमाणे
मॅन इंटिलिजन्स ही संकल्पना अधिकारी गूप्त पध्दतीने थेट फिल्डवर काम करतात. अशी आहे.ही संकल्पना भारतात आय.बी. राबवते. आमचे फंक्शन आणि जबाबदार्‍या वेगळ्या असल्यामुळे मॅन इंटीलिजन्स एसआयडी मधे राबवण्याची गरंज पडंत नाही.राज्यामधे वरिष्ठ अधिकारी, नेते. यांच्यावर आरोप होत आहेत. या विषयी स्टेट इंटीलिजन्स आपली भूमीका चोखपणे बजावत असते. व प्रशासनाला अपडेट दिलले जातात.तीन वर्षांपूर्वी औरंगाबादेत कचरा प्रकरणावरुन मोठी दंगल पेटली होती. त्यावेळेस शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी एसआयडी बाबत नाराजी व्यक्त केली होती. मी जरी त्यावेळेस नसलो तरिही माहिती आमच्याकडे आहे. तसेच सत्ताधारी पक्षाकडून अशा यंत्रणांचा वापर विरोधकांना लगाम लावण्यासाठी करतात या आरोपात काहीही तथ्य नाही.असेही आयुक्त म्हणाले.जर आमच्या विभागात कर्तव्य पार पाडण्यास कोणी अधिकारी कुचराई करंत असेल तर त्यावर निश्र्चीत कारवाई केली जाईल असेही शेवटी आयुक्त म्हणाले.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार