Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : आपल्याच पक्षाचे नेते आपल्यावर हल्ला करत आहेत : राहुल गांधी

Spread the love

नवी दिल्ली | केंद्रातील विद्यमान मोदी सरकारचा संदर्भात देताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या आजीच्या काळात म्हणजेच इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये लागू झालेली आणीबाणी चुकीची होती, असे  धाडसी वक्तव्य कॉर्नेल विद्यापीठाच्या एका व्हर्च्युअल चर्चेत केले आहे . आणीबाणी चुकीची होती, पण त्यावेळी जे झाले आणि आज देशात जे होत आहे पण या दोन्हीत फरक आहे, असेही  राहुल गांधी म्हणाले. दरम्यान युवा आणि विद्यार्थी संघटनांमध्ये निवडणुकांना प्रोत्साहन दिले यावरून माध्यमांमधून आपल्यावरच टीका झाली. पक्षात निवडणुका घेण्यासाठी आपल्याला सुळावर चढवलं जात आहे. आपल्याच पक्षाचे नेते आपल्यावर हल्ला करत आहेत, असेही  राहुल गांधी म्हणाले.

बुधवारी कौशि बसु यांच्यासोबत  झालेल्या चर्चे दरम्यान राहुल गांधी म्हणाले कि , काँग्रेस पक्षाने कधीही घटनात्मक संरचना बळकावण्याचा प्रयत्न केला नाही. आमच्या पक्षाच्या रचना आम्हाला असे  काही करण्याची परवानगी देत नाही. इच्छा झाली तरीही आम्ही असे  करू शकत नाही. काँग्रेसने कधीही संस्थांचा लाभ उचलण्याचा प्रयत्न केला नाही. पण विद्यमान सरकार भारताच्या लोकशाही व्यवस्थेला नुकसान पोहोचवत आहे. प्रत्येक संस्थेच्या स्वायत्ततेवर हल्ला केला जातोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करत आहे. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त यंत्रणांवरही एका विचारधारेचा पगडा आहे. माध्यमांपासून ते कोर्टापर्यंत सर्वांना लक्ष्य केलं जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

मोदी सरकारवर हल्ला बोल करताना ते म्हणाले कि , संसदेत चर्चेवेळी माइक बंद केला जातो. आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. लोकशाहीवर मोठा हल्ला होतोय. मणिपूरमध्ये राज्यपाल भाजपची मदत करत आहेत. पुदुच्चेरीत राज्यपालांनी अनेक विधेयकं मंजूर होऊ दिली नाहीत. कारण ती आरएसएसशी संबंधित होती. भारतात आता हुकूमशाही सुरू आहे. पक्षात लोकशाही पद्धतीने निवडणूक व्हायला हवी. हे अत्यंत गरजेचे आहे, असे  आपण सर्वप्रथम बोललो होतो. पण इतर पक्षांत मात्र असे प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. भाजप, बसपा आणि समाजवादी पार्टीत लोकशाही आहे की नाही? हा प्रश्न केला जात नाही. पण काँग्रेसला मात्र हा सवाल केला जातो. आमच्या पक्षाची विचारधारा , देशाच्या घटनेची विचारधारा आहे. यामुळे आम्हाला लोकशाही जपणे गरजेचे आहे,

आपलं सरकार

Click to listen highlighted text!