Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : औरंगाबादकरांना महापालिका प्रशासकांनी दिला हा इशारा

Spread the love

औरंगाबाद । कोरोनाचा शहरातील वाढता संसर्ग लक्षात घेता ,  प्रशासन सतर्क झाले असून स्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. त्यात औरंगाबाद महापालिका हद्दीत तर अत्यंत कठोर पावले उचलण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शहराच्या ज्या भागात जास्त गर्दी, जास्त बाधित आढळतील त्या भागात लॉकडाऊन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे

औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी २२५ रुग्ण आढळले होते तर काल मंगळवारी ३२५ नवे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ५० हजार ९१६ पर्यंत पोहोचली आहे. तसेच मंगळवारी जिल्ह्यातील १२८ बाधित करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या ४७ हजार २५६ झाली आहे तर  जिल्ह्यात २ हजार ३८९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, महापालिकेतर्फे शहरातील पाच प्रमुख सरकारी कार्यालयांत करोना चाचणी केली जात आहे. अँटिजेन पद्धतीने करण्यात येत असलेल्या या चाचणीत मंगळवारी सात व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.

मुंबईतून परतलेल्या एसटी कामगाराचा मृत्यू

मुंबईत बेस्ट बसमध्ये प्रवासी वाहतूक करण्याचे कर्तव्य बजाविल्यानंतर औरंगाबादला परतलेले एसटी कामगार रंजित चव्हाण (४५, रा. एन ५, सिडको) यांचा करोनाने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रंजित चव्हाण यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तिथे त्यांचा मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!