Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तामिळनाडूतील फटाक्यांच्या फॅक्ट्रीला भीषण आग

Spread the love

तामिळनाडूतील विरुधुनगरमध्ये शुक्रवारी एका फटाक्यांच्या फॅक्ट्रीला भीषण आग लागली आहे. या दूर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला तर 20 पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. सत्तुर नजिक अचानकुलम येथील फॅक्ट्रीत आग लागल्यानंतर येथे बरेच स्फोट झाले. घटनास्थळी असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फटाके तयार करण्यासाठी केमिकल मिक्स करताना ही दुर्घटना घडली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून या दूर्घटनेत प्रभावित झालेल्यांसाठी नुकसान भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. मृतांच्या नातलगांना प्रत्येकी 2 लाख रुपये. तर गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये देयण्याची घोषणा करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!