Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोरोना लसीकरण संपताच सीएए लागू होईल अमित शहा यांनी डागली तोफ

Spread the love

कोरोना लसीकरण मोहिम संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत निर्वासितांना नागरिकत्व दिले जाणार आहे. पश्चिम बंगालमधील रॅलीमध्ये बोलत असताना अमित शाह यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत आता त्यांची वेळ संपली असल्याचे म्हटले.

“दीदींची वेळ संपली आहे. बंगाल निवडणूक संपेपर्यंत ममतादीदी ‘जय श्री राम’ म्हणतील हे माझे आश्वासन आहे. भाजपाच्या नेतृत्वात पुढील सरकार स्थापन होईल. मी शंतनू ठाकूर यांना आश्वासन दिले आहे की, मी येथे येऊन सीएएसंबंधी सर्व शंका दूर करणार आहे,” असे अमित शाह यांनी यावेळी सांगितले. दरम्यान अमित शाह यांनी यावेळी आयुषमान योजना लागू केली जाणार असल्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांना वार्षिक थकबाकी व्यतिरिक्त सहा हजारांची मदत केली जाईल असे सांगितले. पश्चिम बंगालमध्ये सत्ता आल्यानंतर केंद्र सरकार ‘शरणार्थी कल्याण योजना’ राबवणार आहे असेही ते म्हणाले.

“२०१८ मध्ये आम्ही सर्वांसाठी सीएए असे आश्वासन दिले होते. २०१९ मध्ये आम्हाला त्यांनी समर्थन दिले आणि २०२० मध्ये सीएए आले . ममता बॅनर्जी यांनी आपण सीएएला परवानगी देणार नाही असे म्हटले होते . आम्ही जे आश्वासन देतो ते पूर्ण करतो. कोरोना लसीकरण आणि महामारी संपताच आम्ही सीएए लागू करणार,” असे आश्वासन अमित शाह यांनी दिले आहे.

#Live | Budget2021| Loksabha Live 11.Feb.2021
Like| Share| Subscribe

आपलं सरकार

Click to listen highlighted text!