Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

18 वर्षांनी पाकिस्तानच्या जेलमधून सुटका झालेल्या हसीना बेगमचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Spread the love

तब्बल 18 वर्षांनी पाकिस्तानच्या जेलमधून सुटका झाल्यानंतर भारतात परतलेल्या हसीना दिलशाद अहमद यांचे आज (9 फेब्रुवारी) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. औरंगाबादमध्ये त्यांनी वयाच्या 65 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा दफनविधीही आज पार पडला.

हसीना बेगम आपल्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी 18 वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. पासपोर्ट हरवल्याने हसीना बेगम यांना पाकिस्तान पोलिसांनी गुप्तहेर समजून अटक केली होती. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांच्या प्रयत्नाने त्यांची 18 वर्षांनंतर जेलमधून सुटका झाली होती. 26 जानेवारी 2021 रोजी त्या औरंगाबादला परतल्या होत्या. परंतु आयुष्यातील 18 वर्षे पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद राहिलेल्या हसीना बेगम यांना उर्वरित आयुष्य कुटुंबीयांसोबत घालवण्याचे सुखही मिळाले नाही. पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर अवघ्या 14 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला आहे.

या वृध्देला पाकिस्तानने भारतीय जासूस म्हणून १८ वर्षे कारागृहात डांबले

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या सिटी चौक स्टेशन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राशिदपुरा परिसरात राहणाऱ्या हसीना बेगम यांचा निकाह उत्तर प्रदेशच्या सहारनपूरचा रहिवासी असलेल्या दिलशाद अहमदसोबत झाला होता. आपण निर्दोष असल्याचे हसीना बेगम यांनी पाकिस्तानच्या कोर्टात सांगितले होते. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मागितली. हसीना बेगम यांच्या नावावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत एक अधिकृत घर आहे, अशी माहिती औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तानला पाठवली. त्यानंतर पाकिस्तानने जानेवारी महिन्यात त्यांची सुटका केली आणि त्यांना भारताच्या अधिकाऱ्यांकडे सोपवले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!