केंद्र सरकारच्या दबावाखाली सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार – अनिल देशमुख

दिल्लीतील शेतकरी आंदोलनबाबत सेलिब्रिटींनी केलेले ट्वीट भाजप सरकारच्या दबावात येऊ केले आहेत का असा प्रश्न उपस्तीत झाला होता. त्या ट्वीटची आता चौकशी होणार आहे. राज्याचं गुप्तहेर विभाग याची तपासणी करणार आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
ग्लोबल सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सिनेकलाकार, क्रिकेटर यांनी देखील ट्वीट केले होते. पॉप स्टार रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा सारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्वीट केले होते. यामध्ये सुनील शेट्टीने मुंबई भाजप नेते हितेश जैन यांना टॅग केले होते. तर अक्षय कुमार आणि सायना नेहवाल ह्यांच्या ट्वीटमधील शब्द समान होता. यावरून हे सेलिब्रिटी भाजप सरकारच्या दबावात येऊन ट्वीट करत आहेत का? असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीनंतर गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.