Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#FarmerProtest : राकेश टिकैत यांचा सरकारला अल्टिमेटम, २ ऑकटोबर पर्यंत दिला वेळ

Spread the love

कृषी कायदे रद्द करण्यासाठी आम्ही सरकारला २ ऑक्टोबर पर्यंतचा वेळ दिला आहे. यानंतर आम्ही पुढील नियोजन करणार आहोत. तसेच, आम्ही दबावात सरकार सोबत चर्चा करणार नाही. तिन्ही कृषी कायदे रद्द केल्यानंतरच आम्ही घरी परत जाणार आहोत, असा स्पष्ट इशारा भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी दिला आहे.सरकारने कृषी कायदे रद्द करावेत आणि एमएसपीवर कायदा बनवावा, नाहीतर आंदोलन सुरूच राहील. आम्ही संपूर्ण देशभरात यात्रा काढू आणि संपूर्ण देशात आंदोलन होईल. असेही राकेश टिकै यांनी म्हटले आहे.

आज देशभरात शेतकरी संघटनांकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना महामार्गावर ठिय्या मांडत आंदोलन केले . दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत हे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. दरम्यान, गाझीपूर बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या टिकैत यांनी त्यांचा मार्ग रोखणाऱ्या पोलिसांसमोर हात जोडले आणि जय जवान, जय किसानच्या घोषणा दिल्या. तसेच आपण सर्वजण भाऊ-भाऊ आहोत असंही ते पोलिसांना म्हणाले.

“शेतकरी आणि जवान देशाचा कणा आहेत. शेतकरी आपल्या अधिकारांसाठी आंदोलन करत आहेत, तर पोलीस आपले कर्तव्य निभावत आहेत. त्यांचे  कोणाशीही शत्रूत्व नाही, हे जवान तर आपले भाऊ आहेत. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला आपण शतशः नमन करतो. शेतकऱ्यांच्या मागण्या तर भाजपा सरकारकडे आहेत. ज्यांनी तीन काळे कायदे आणून भाकरी तिजोरीत बंद करण्याचा प्रयत्न केला आहे” तर, आपले हक्क मिळवल्याशिवाय शेतकरी दिल्लीच्या सीमेवरुन कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरी परतणार नाहीत, असेही टिकैत यांनी म्हटले आहे.

कृषी कायद्यांविरोधात शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता देशभरात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या चक्का जामला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ठिकठिकाणी शेतकरी आंदोलकांनी रस्त्यावर येत वाहतूक रोखली आहे. आंदोलकांनी पंजाब, हरयाणात जाणारे महामार्ग बंद केले. गाझीपूर बॉर्डरवरही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं असून, “देशातील शेतकऱ्यांना मातीशी जोडू, नव्या युगाचा जन्म होईल,” असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी चक्का जाम आंदोलन सुरू झाल्यानंतर म्हटले आहे.

चक्का जाम आंदोलन सुरू झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले,”देशभरात शांततेत चक्का जाम आंदोलन सुरू झाले आहे. देशाच्या मातीशी शेतकऱ्यांना जोडणार आहोत. यातून नव्या युगाचा जन्म होईल. इथे राजकारण करणारे नाहीत. कुठे दिसत आहेत. इथे कुणीही येत नाहीये. हे जनआंदोलन आहे. भाकरी तिजोरीत बंद होऊन नये म्हणून हे आंदोलन आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही गोंधळ घालणारे होते, त्यामुळे तिथे चक्का जाम करण्यात आलेला नाही. आम्ही कुठेही जाणार नाही. आम्ही ऑक्टोबर पर्यंत इथेच बसून आहोत,” असा इशाराही टिकैत यांनी केंदर् सरकारला दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!