Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मनसैनिकांचा राडा; खैरेंच्या अंगावर पत्रके भिरकावली!

Spread the love

आरंगाबादच्या नामांतरावरून मनसे-शिवसेना आमने-सामने

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी भररस्त्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या अंगावर पत्रके भिरकावल्याची घटना घडली आहे. औंरगाबाद शहराच्या नामांतरावरुन मनसे व शिवसेना यानिमित्ताने आमने-सामने आले आहेत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर कधी करणार? असा संतप्त सवालही मनसे कार्यकर्त्यांनी चंद्रकांत खैरे यांना यावेळी विचारला.
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी गुरुवारी मनसेने शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली. शहरातील क्रांती चौकामध्ये ही घटना घडली. खैरे यांच्या अंगावर पत्रके भिरकावत त्यांना जाब विचारण्यात आला. खरे तर उद्या (शुक्रवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, यासाठीचा वाद सुरु आहे. मनसेने औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी 26 जानेवारीचे अल्टिमेटम दिले होते. त्यानंतर मनसेकडून आता चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून आंदोलन करण्यात आले. यावेळी खैरे यांनी मनसेची ही स्टंटबाजी असल्याचे म्हटले तर मनसेनेदेखील शिवसेनेला हे करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे.
याप्रकरणी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, माझ्या अंगावर पत्रकं भिरकावली नाही. फक्त दाखवली त्यांनी, हरकत नाही. मी ती घेतली आणि पुन्हा त्यांच्या अंगावर फेकली. मनसे हे फक्त नाटक करण्यासाठी उभे आहेत. मी स्वतः सांगतो की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे. लवकरात लवकर तो आपल्याला दिसून येईल. पण मनसेला श्रेय मिळणार नाही, श्रेय फक्त शिवसेनेला मिळणार आहे. म्हणून मी सांगतो की, कोणत्याही परिस्थिती लवकरात लवकर नामांतर होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!