Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आरंभशूर मुख्यमंत्र्यांनी नुसतेच विकास कामाची केली उदघाटने- अतुल सावे

Spread the love

औरंगाबाद- आरंभशूर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांच्या वाढदिवशी शहरातील तीन विकास कामांचे नुसते उदघाटन केले.दीड महिना झाला तरी एकाही कामाची वर्क आँर्डर अद्याप दिली गेली नाही.हे करतात काय? असा प्रश्न आ.अतुल सावे यांनी केला.

आ.सावे यांनी खा. इम्तीयाज जलील आणि शहरातील शिवसेनेच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. ज्या वक्फ बोर्डावर खा.जलील माध्यमांसमोर नौंटंकी करतात. मागचेपाच वर्ष आमदार असतांना काय झोपा काढंत होते का ? खासदार झाले म्हणून लोकांना मूर्ख समजू नये असा सल्लाही आ.सावे यांनी दिला. आणि शिवसेनेनी सफारी पार्क, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान,जलवाहिनी चे उदघाटन करायची एवढी घाई का केली ? हेच उदघाटन २३जानेवारीला केले असते तर आणखी चांगली भावना शिवसेनेविषयी जनतेमधे निर्माण झाली असती. तसेच मुख्यमंत्री ठाकरे शहरात येणार म्हणून यांनी स्मार्टसिटीचा निधी, तसेच प्रशासनाचे निधी वापरले. अंदाजे १५ते२०लाखांची जाहिरातबाजी केली. अशा राज्यकर्त्यांना जनता त्यांची जागा दाखवल्या शिवाय स्वस्थ बसणा नाही. असेही शेवटी आ.सावे म्हणाले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!