Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate :राजधानीत राजपथवर सुरु आहे शानदार परेड , दिल्लीच्या सीमेवर हजारो सशस्र सुरक्षारक्षक तैनात

Spread the love

राजधानीत कडेकोट बंदोबस्तात देशात आज ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. देशावर कोरोनाचं संकट असले तरी देशातील नागरिकांमध्ये मात्र उत्साह कायम आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजपथावर आज शानदार सुरुवात झाली आहे. दुसरीकडे दिल्ली सीमेवर कृषी कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकरी संघटनांकडून आज ट्रॅक्टर रॅलीही काढण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर  राजपथावर आणि राष्ट्रीय राजधानीच्या सीमांवर हजारो सशस्र सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राजपथवर तिरंगा फडकावल्या नंतर या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा परेड विजय चौकातून सुरू होऊन नॅशनल स्टेडियमपर्यंत जाणार आहे. दरवर्षी ही परेड राजपथापासून सुरू होऊन लाल किल्ल्यापर्यंत जाते. सकाळी ११.३० पर्यंत परेड सुरू राहील.

प्रारंभी राष्ट्रीय युद्ध स्मारकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट राजपथावर दाखल झाले. इथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानांना अभिवादन केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही शहीद जवानांना सलामी दिली. यावेळी तीनही सेनाप्रमुखही उपस्थित होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळीच देशवासियांना ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा सोशल मीडियावरून दिल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!